धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण; अंजली दमानिया संतापल्या, म्हणाल्या…

On: November 24, 2025 5:28 PM
Anjali Damania On Dhananjay Munde
---Advertisement---

Anjali Damania On Dhananjay Munde | परळी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अलीकडेच सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची आठवण काढत भावनिक विधान केलं. या विधानानंतर सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही संताप व्यक्त केला आहे. (Anjali Damania On Dhananjay Munde)

मुंडेंनी निवडणूक प्रचारादरम्यान वाल्मिक कराड याला ‘गोरगरिबांसाठी २४ तास चालणारे जगमित्र कार्यालय सांभाळणारा’ म्हणून गौरवले. यामुळे परळीत राजकीय समीकरणे बदलत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, हत्या प्रकरणातील आरोपीविषयी सहानुभूती व्यक्त करणं म्हणजे अन्यायग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

अंजली दमानियांचा संताप: “चप्पलांचा हार घालायला हवा!” :

अंजली दमानिया यांनी बोलताना धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्राने न्यायासाठी लढा दिला. आरोपीची आठवण काढून प्रचार करणं म्हणजे नागरिकांचा अपमान अशा व्यक्तीला परळीकरांनी चपलांचे हार घातले पाहिजेत!”

याच वक्तव्यानंतर सोशल मीडियावर दमानिया आणि मुंडे यांच्यातील संघर्ष चर्चेचा विषय बनला आहे. दमानिया पुढे म्हणाल्या की, “वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचं क्रौर्य सर्वांनी पाहिलं आहे. अशा व्यक्तीची आठवण करून मत मागणाऱ्यांना परळीकरांनी पुन्हा कधीही निवडून देता कामा नये. त्यांनी पुन्हा सत्ता मिळवली तर मी परळीत कधीही पाय ठेवणार नाही.”

त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलं असून समर्थक–विरोधकांमध्ये वाद सुरू झाले आहेत.

Anjali Damania On Dhananjay Munde | धनंजय मुंडेंची ‘भावनिक खेळी’? :

राजकीय तज्ञांच्या मते, मुंडेंनी केलेलं वक्तव्य ही केवळ भावना व्यक्त करण्यापलीकडे राजकीय रणनीती असू शकते. वाल्मिक कराड याला परळीत मोठा जनाधार असल्याचं बोललं जातं. काही राजकीय निरीक्षकांचं मत आहे की, कराड समर्थकांची मते स्वतःच्या बाजूला ठेवण्यासाठी मुंडेंनी हा भावनिक पवित्रा घेतला आहे. (Anjali Damania On Dhananjay Munde)

कराड यांच्या अटकेनंतर मुंडेंनी त्यांच्यासोबत उघडपणे उभे न राहिल्याची नाराजी कराड कुटुंबाने आधीच व्यक्त केली होती. तसेच, त्या प्रकरणात राजकीय कट रचून त्यांना फसवण्यात आल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळेच आता निवडणुकीच्या काळात मुंडेंनी अचानक वाल्मिकची आठवण काढणे संशयास्पद असल्याचं सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधकांचे म्हणणे आहे.

News Title: Anjali Damania lashes out at Dhananjay Munde for praising Valmik Karad, says “He deserves garland of slippers”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now