“शिंदेंचा खासदार *** करतो”, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारा आरोप

On: November 4, 2023 6:09 PM
---Advertisement---

मुंबई | प्रसिद्ध युट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी 2’ विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) याच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष, ड्रग्ज आणि परदेशी मुलींच्या पुरवठ्या प्रकरणी एल्विश यादव वादाच्या भोवऱ्यात आडकला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एल्विश यादव याची चर्चा रंगली आहे.

रेव्ह पार्टी प्रकरणी एल्विश यादव याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकारण देखील तापलं आहे. कारण एल्विश यादव हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी गणपती दरम्यान आरती करताना दिसला होता. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं होतं. आता या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय.

संजय राऊतांचा गंभीर आरोप

ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. एल्विश यादवला वर्षावर घेऊन येणार खासदार ड्रग्ज सेवन करतो, तर ड्रग्ज प्रकरणाची सूत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यात आहे का? असा धक्कादायक दावा राऊतांनी केला आहे.

शिंदे दे टोळीतील कुणाचे एल्विश यादवशी संबंध आहे का? हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं, असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. यावर त्यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीस म्हणाले ठाकरे गटाते वैफल्यग्रस्त नेते एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करताय. ज्यावेळी एल्विश यादव हा मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी आला तेव्हा त्यांच्यावर कोणतेही आरोप नव्हते तेव्हा तो फक्त सेलिब्रिटी म्हणून आला. त्यामुळे आता त्यांच्यावर आरोप आहेत तर असं वक्तव्य काही लोकं मुख्यमंत्र्यांवर आरोप करताय, हे धंदे वैफल्यग्रस्त उबाठाचे नेते करताय, असं शिंदे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

ललित पाटील प्रकरण: ससून डीन, भाजप नेत्यावर खळबळजनक आरोप

‘अजित पवारांमुळेच…’; मीरा बोरवणकरांचा नवीन आरोप

मोठी बातमी! मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय 

‘ते 10 लाखांचे चेक्स…’; आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांची सरकारकडून अवहेलना

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now