Amol Kolhe | शरद पवार गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील एकमेकांवर सतत आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. आता तर त्यांनी एकमेकांना थेट आव्हानच दिलं आहे.
अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. “काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीचं भल होतंय हे कळतंय”, असा आरोप अमोल कोल्हे यांनी आपल्या ओतूर येथील भाषणात केला होता.
आढळराव पाटील यांचं कोल्हे यांना आव्हान
कोल्हे यांच्या आरोपांनंतर आढळराव पाटील चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी कोल्हे यांना थेट आव्हानच दिलं आहे. गेली तीन महिने फक्त कांदा-कांदा करणाऱ्या कोल्हेंकडे कोणतेच विषय शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे ते घाणेरडे, खालच्या पातळीचे आणि निचपणाचे आरोप करू लागलेत, असं आढळराव पाटील म्हणालेत.
माझ्यावर केलेल्या आरोपांचे आता कोल्हे यांनी पुरावे द्यावेत, मी स्वतः शिरूर लोकसभेतून माघार घेतो. अन्यथा कोल्हे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावं, असं आव्हान आढळरावांनी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना दिलं.
अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले होते?
काहींनी पंधरा वर्षात शेती प्रश्नाऐवजी संरक्षण खात्याच्या प्रश्नांनाच प्राधान्य दिलं. सॉफ्टवेअर कधी खरेदी करणार आणि काँट्रॅक्ट कधी निघणार एवढीच त्यांना चिंता लागलेली होती. यावरून कोणाला जनतेच्या प्रश्नांची आस आहे आणि कोणाला फक्त आपली कंपनी वाढवण्याचा हव्यास आहे, ते दिसून येतंय, अशी टीका अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केली होती.
अमोल कोल्हे यांनी आव्हान स्वीकारलं
दरम्यान, आढळरावांनी दिलेलं आव्हान अमोल कोल्हे यांनी स्वीकारलं आहे. “ओतूरच्या सभेत जे बोललो त्याचं पुराव्यानिशी उत्तर देतो, मग शब्द फिरवायचा नाही,” असं म्हणत डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आव्हान स्वीकारलं. आता डॉ. कोल्हे यांनी पुरावे दिल्यावर आढळराव आपल्या शब्दावर ठाम राहतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे.
News Title – Amol Kolhe serious allegations against Shivajirao Adhalrao
Patil
महत्त्वाच्या बातम्या –
महायुतीला पाठिंबा जाहीर करताच अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावरील जप्ती मागे
सलमानने ऐश्वर्या नाही तर ‘या’ मुलीला घातलेली लग्नाची मागणी!
चित्रा वाघ नव्या संकटात, ‘त्या’ अभिनेत्याने समोर येऊन केली मोठी मागणी
स्वप्नांचा चक्काचूर; T20 World Cup मध्ये ‘या’ खेळाडूला डच्चू, वडिलांनी व्यक्त केली नाराजी






