धक्कादायक प्रकरणी अमोल कोल्हे पुरावे देणार, आढळराव राजकारणातून बाजूला होणार का?

On: May 3, 2024 9:38 PM
---Advertisement---

Amol Kolhe | राज्याच्या राजकारणात शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आलीये. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेतून आयात केलेले उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा एकदा शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांआधी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आढळराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यानंतर आढळराव यांनी हे आरोप खोटे आहेत खरे असतील तर पुरावे आणा. मी राजकारणातून बाहेर पडायला तयार असल्याचं वक्तव्य आढळराव पाटील यांनी केलं आहे. तेव्हा अमोल केल्हे यांनी पुरावे देतो असं सांगितलं मात्र शब्द फिरवायचा नाही असा इशारा देखील दिला आहे.

‘त्या’ प्रश्नाने कोणाचं भलं होतंय?

अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्या जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. आढळराव आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे गावोगावी भेट देत मतदारांना विश्वासात घेत आहेत. नुकतीच ओतूर येथे शरद पवार यांची सभा पार पडली होती. त्या सभेमध्ये अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आढळराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. काही लोक फक्त 60 ते 70 प्रश्न विचारण्यासाठी संसदेत गेले. ते प्रश्न देखील संरक्षण खात्याविषयी विचारण्यात आले होते, या प्रश्नाने कोणाच्या कंपनीचं भलं होतंय हे कळतंय, असा दावा अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केला.

पुरावे द्या राजीनामा देतो

अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर आरोप केले. आता ते आरोप आढळराव पाटील यांनी फेटाळले आहेत. पुरावे द्या, राजकारणातून मी बाहेर पडतो, असं आव्हान आढळराव पाटील यांनी केलं. त्यावर अमोल कोल्हे यांनी आव्हान स्विकारतो शब्द फिरवायचा नाही, असं म्हटलंय.

शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात पार पडणार आहे. राज्याचे लक्ष या लोकसभा निवडणुकीकडे लागलं आहे. आढळराव पाटील यांच्याकडून अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस सभा घेताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांआधी मी अमोल कोल्हे यांना पाडणार असल्याचा दावा केला होता. आता निवडणुकीची तारीख तोंडावर आली आणि दोन्ही उमेदवार एकमेकांवर तुटून पडले आहेत.

तिसऱ्या टप्प्यात शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील आमने सामने दिसणार आहेत. मतदार येत्या निवडणुकीदिवशी कोणाला आपलं मत देतील हे निकाला दिवशीच कळेल.

News Title –  Amol Kolhe Challenge To Adhalrao Patil So Adhalrao patil Will Walk Away From Politics

महत्त्वाच्या बातम्या

आमदाराच्या कुटुंबातील गाडीचा भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

‘आई आणि नंदा वहिणीबद्दल बोलाल तर…’; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा?

उन्हाळ्यात दिवसभर एसीमध्ये बसताय?; होऊ शकतात ‘हे’ मोठे आजार

उद्योगपती अदानी यांना मोठा दणका; ‘या’ 6 कंपन्यांना कारणे दाखवा नोटिस

चित्रा वाघ यांनी तोंड उघडलं त्यांचे खूप आभार…- किरण माने

Join WhatsApp Group

Join Now