Arvind Kejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने मोठा दिलासा आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे सध्या केजरीवाल जामिनावर बाहेर आले आहेत. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीच्या अटकेत असलेल्या अरविंद केजरीवाल यांना जामीन प्राप्त होताच त्यांनी दिल्लीच्या कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतलं.
तसेच त्यांनी नजिकचे शनि मंदिर आणि नवग्रह मंदिर गाठले. केजरीवाल यांच्या स्वागताची भव्य तयारी आपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. यावेळी केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल अनोखी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी यावर्षी पंतप्रधान कोण होणार, याबाबत मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला मोदी 75 वर्षांचे होत आहेत. 2014 मध्ये ज्याचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त होईल त्याला निवृत्त केले जाईल असा कायदा पक्षामध्ये मोदी यांनी बनवला होता, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. लालकृष्ण आडवाणी यांना आधी निवृत्त केलं. मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, यशवंत सिन्हा यांना देखील निवृत्त केलं आहे. आता मोदी 17 सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. मी भाजपला विचारू इच्छीत आहे की तुमचा पंतप्रधान पदाचा दावेदार कोण आहे?, असा सवाल केजरीवाल (Arvind Kejriwal )यांनी केला.
तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप सरकारमध्ये आलं तर दोन महिन्यात योगीजी यांना निपटतील. त्यानंतर अमित शाह यांना पंतप्रधान बनवले जाईल. मोदीजी स्वत:साठी नाही तर अमित शाह यांच्यासाठी मते मागत असल्याचं देखील केजरीवाल म्हणाले आहेत.
“..तर उद्धव ठाकरे यांना अटक होणार”
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत केजरीवाल यांनी गंभीर आरोप केले आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायचंय. ते विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुरुंगात पाठवतील. माझ्याकडून तुम्ही एफिडेविट लिहून घ्या, हे लोकसभेची निवडणूक जिंकले, तर थोड्याच दिवसात उद्धव ठाकरे, ममता बनर्जी, तेजस्वी यादव आणि स्टॅलिन तुरुंगात दिसतील” असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुढे त्यांनी लोकसभेच्या निकालाबाबतही भाकीत केलं. “जेलमधून बाहेर आल्यावर गेल्या 20 तासात मी देशभरातल्या अनेकांशी बोललोय, त्यावरून असा अंदाज येतो की 4 जून नंतर भाजपचं सरकार बनणार नाही. जवळपास सर्वच राज्यात भाजपच्या जागा कमी होणार आहेत. सट्टा बाजारानुसार 220 जागा येऊ शकतात,” असा दावा देखील अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केलाय.
News Title – Amit Shah will become the Prime Minister said Arvind Kejriwal
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यात राज ठाकरेंच्या सभेचा इम्पॅक्ट होणार, फतव्यामुळं मोहोळांचं पारडं जड
अजित पवारांच्या सभांनंतर नूर पालटला, राष्ट्रवादीची सगळी ताकद श्रीरंग बारणेंच्या पाठिशी!
“राज ठाकरेंना आताच एवढा पुळका का?, भाजपची राज ठाकरेंनाही धमकी?”
पुढील चार दिवस धोक्याचे; पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट
प्रज्वल रेवन्नानंतर भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, राजकारणात खळबळ






