Ameesha Patel | ‘गदर 2’ (Gadar 2) चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर (box office) त्याने दमदार कमाई केली. चित्रपटाला यश मिळाले, पण अमिषा पटेल आणि दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांच्यातील वादामुळे चित्रपट चर्चेत आला आहे. हा वाद चित्रपटाच्या क्लायमॅक्सवरून सुरु आहे. आधी अमिषा पटेलनं दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यावर आरोप केले होते, त्यानंतर आता अनिल शर्मा अमिषा पटेलवर भडकले आहेत.
क्लायमॅक्स बदलावरून वाद
अमिषा पटेलने एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये ती खलनायकाला मारणार होती, परंतु दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी कथानकात बदल केले. यावर अनिल शर्मा यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी बदल केले, तेव्हा त्याबद्दल अमिषाला सांगण्यात आले होते आणि सर्व काही स्क्रिप्टमध्ये नमूद केले होते.
अमिषाने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक खासगी व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना सत्य सांगितले आहे. व्हिडिओमध्ये अनिल शर्मा, अमिषा आणि तिच्या टीमला चित्रपटाच्या क्लायमॅक्सबद्दल माहिती देताना दिसत आहेत. अमिषाने कॅप्शनमध्ये लिहिले, “मला माहीत नाही की हे पाहिल्यानंतर अनिल शर्मा सर काय म्हणतील. मी मुलाखतीत जे सांगितले होते, त्याचा हा व्हिडिओ पुरावा आहे. अनिल सर, उघडपणे सांगत आहेत की मीच खलनायकाला शेवटी मारेन. कारण तुम्ही लोकांनी हे पाहिलं नव्हतं, म्हणून मी हा व्हिडिओ इथे शेअर करत आहे, जेणेकरून मी स्वतःला सिद्ध करू शकेन.”
अनिल शर्मा यांचे स्पष्टीकरण
अनिल शर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा अमिषाने सांगितले की ती पाकिस्तानला (Pakistan) जाईल आणि खलनायकाला मारेल, तेव्हा त्यांनी तिला नकार दिला होता. तसेच, स्क्रिप्टमध्ये हा भाग नसल्याचेही सांगितले होते. “पाकिस्तान टुरिस्ट सेंटर (tourist center) आहे, तिथे सनी देओल (Sunny Deol) सगळ्यांना घेऊन जाईल का? मुलगा तिथे अडकला आहे, तर बायकोलाही घेऊन जाईल का? एखाद्या माणसाने बायकोवर बंदूक ठेवली तर तो अडकून पडेल ना? तारा सिंग वेडा आहे का?”, असं शर्मा म्हणाले.
अमिषा पटेलने चित्रपटात झालेल्या बदलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. तसेच, स्क्रिप्टमध्ये बरेच बदल शूटिंगदरम्यान करण्यात आले, असेही तिने सांगितले. अमिषा आणि सनीला अनेक बदलांबद्दल माहितीच नव्हती. रिपोर्ट्सनुसार, अनिल शर्मा ‘गदर 3’ बनवण्याची शक्यता आहे. मात्र, चित्रपटाची कास्ट काय असेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Title: Ameesha Patel Reveals Gadar 2 Climax Truth






