अमरनाथ यात्रा २०२५: नोंदणी प्रक्रिया झाली सुरू! जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे आणि परवान्याबद्दल सर्वकाही

On: April 18, 2025 8:37 AM
Amarnath Yatra 2025 All You Need to Know
---Advertisement---

Amarnath Yatra 2025 | ‘जय बाबा बर्फानी!’ अशी गर्जना करत दरवर्षी लाखो भाविक हिमालयातील उंच शिखरांवर वसलेल्या पवित्र अमरनाथ गुहेपर्यंतचा खडतर प्रवास करतात. 2025 साली होणाऱ्या या अध्यात्मिक यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया 14 एप्रिलपासून सुरू झाली आहे. या यात्रेचं आयोजन श्री अमरनाथ श्राईन बोर्ड (Shri Amarnath Shrine Board) करत असून, इच्छुक भाविकांसाठी यंदाची यात्रा ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

अमरनाथ यात्रेच्या नोंदणीची प्रक्रिया

या वर्षी अमरनाथ यात्रा 25 जुलै ते 19 ऑगस्ट 2025 या कालावधीत पार पडणार आहे. यात्रेसाठी दररोज फक्त 15,000 भाविकांनाच प्रवेश मिळणार असल्याने लवकरात लवकर नोंदणी करणं गरजेचं आहे. नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून करता येते. अधिकृत वेबसाइट www.jksasb.nic.in वर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज भरू शकता.

ऑनलाइन नोंदणी करताना ‘यात्रा परवाना नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावा. अर्जात नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक यासह वैयक्तिक माहिती भरावी लागते. त्यासोबतच पासपोर्ट साईज फोटो (JPEG, 1MB पर्यंत) आणि आरोग्य प्रमाणपत्र CHC (PDF, 1MB पर्यंत) अपलोड करावं लागतं. OTP पडताळणीनंतर पेमेंट लिंक प्राप्त होते, ज्याद्वारे ₹120 ते ₹220 शुल्क भरून यात्रा परवाना डाउनलोड करता येतो.

यात्रेसाठी अटी-

शारीरिक आणि मानसिक तयारीची गरज असलेल्या या यात्रेसाठी काही निर्बंधही आहेत. 13 वर्षांखालील मुले, 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 6 आठवड्यांहून अधिक गरोदर असलेल्या महिलांना यात्रेत सहभागी होता येणार नाही. प्रत्येक भाविकाकडे RFID कार्ड, आधार कार्ड, आरोग्य प्रमाणपत्र आणि फोटो असणं अनिवार्य आहे. उंचावर श्वास घेण्यास अडचण येऊ शकते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

काय घ्यावं सोबत?

यात्रेदरम्यान उबदार कपडे, पावसापासून बचावासाठी रेनकोट, आवश्यक औषधे, ऊर्जा देणारे अन्नपदार्थ आणि पाण्याची बाटली सोबत ठेवणं गरजेचं आहे. अचानक हवामान बदल होण्याची शक्यता असल्याने पूर्ण तयारीने प्रवास करावा.

ही यात्रा केवळ धार्मिक भावनेचा भाग नसून, ती शारीरिक आणि मानसिक खंबीरतेची कसोटी देखील आहे. योग्य नियोजन, नियमांचं पालन आणि श्रद्धेने परिपूर्ण भाविकांसाठी ही यात्रा जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.

Title : Amarnath Yatra 2025 All You Need to Know

 

Join WhatsApp Group

Join Now