Alia Bhatt | अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि तिची मुलगी राहा कपूर (Raha Kapoor) नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असतात. राहाचे (Raha) अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. स्वतः आलिया देखील अनेकदा आपल्या मुलीचे फोटो शेअर करत असते. पण आता आलियाने (Alia Bhatt) इन्स्टाग्रामवरुन (Instagram) राहाचे (Raha) सर्व फोटो हटवल्यामुळे चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
फोटो हटवण्यामागील कारण
आलिया भट्टने सोशल मीडियावरुन (Social Media) आपल्या मुलीचे, राहाचे (Raha) सर्व फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना राहाचे (Raha) फार कमी फोटो पाहायला मिळतील.
आलियाच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला असला तरी, अनेकांनी तिच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. आलियाने घेतलेला हा निर्णय राहाच्या (Raha) सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे.
अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि त्याच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यानंतर आलियाने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 16 जानेवारी रोजी सैफ (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसली होती. त्याने मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, आणि मुलांना वाचवताना सैफ (Saif Ali Khan) जखमी झाला होता. या घटनेनंतर, आलियाने (Alia Bhatt) राहासाठी (Raha) ‘नो फोटो पॉलिसी’ लागू केल्याचे बोलले जात आहे.
चाहत्यांची प्रतिक्रिया
आलियाच्या चाहत्यांनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. सोशल मिडियावर (Social Media) अनेक चाहते राहाच्या (Raha) सुरक्षिततेसाठी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. आलियाने घेतलेल्या निर्णयामुळे, राहाचे (Raha) फोटो आणि व्हिडिओ भविष्यात सोशल मीडियावर (Social Media) कमी प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे.
Title : Alia Bhatt Removes Daughter Rahas Photos from Instagram






