अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाला नवं वळण; पालक दीड महिन्यांपासून बेपत्ता, नेमके गेले कुठे?

On: April 8, 2025 8:40 AM
Akshay Shinde Encounter Case Parents Missing 
---Advertisement---

Akshay Shinde Encounter Case | बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटरनंतर सुरू झालेल्या चौकशीत आता नवा ट्विस्ट आला आहे. दीड महिन्यांपासून अक्षयचे पालक अचानक गायब असून, ते बेपत्ता झाल्याने हे प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. (Akshay Shinde Encounter Case)

शिंदेचे पालक कुठे गेले? घर बंद, वकिलांचाही संपर्क नाही

अंबरनाथमध्ये मावशीकडे वास्तव्यास असलेले अक्षय शिंदेचे पालक आता कुठेच सापडत नाहीयेत. त्यांचे घर बंद असून, शेजाऱ्यांनाही त्यांचा ठावठिकाणा माहीत नाही. अक्षयच्या एन्काउंटरनंतर पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून वकिलांमार्फत (Adv. Amit Katarnavare) लढाई सुरू केली होती. मात्र काही दिवसांनी त्यांनी केस लढण्याची इच्छा नसल्याचे कोर्टात सांगितले आणि त्यानंतर ते वकिलांच्या संपर्कातूनही बाहेर गेले. जवळपास दीड महिन्यांपासून त्यांच्याबाबत कोणतीही माहिती नाही. त्यामुळे त्यांच्या बेपत्त्यामुळे संशय आणखी गडद होत आहे.

या प्रकरणात आधीच अंबरनाथ (Ambernath) व बदलापूर (Badlapur) परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. आरोपीच्या कुटुंबाने केलेले आरोप आणि त्यानंतर त्यांचे अचानक गायब होणे, यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे. अक्षय शिंदेचा एन्काउंटर खरा होता का? की तो एक योजनाबद्ध कट होता? हे प्रश्न अधिकच तीव्र होत आहेत.

उच्च न्यायालयाचे आदेश : पोलिसांवर गुन्हा दाखल करा

या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा. न्यायालयात अण्णा शिंदे (Akshay Shinde’s father) यांनी याचिका दाखल करत पोलिसांवर नियोजनबद्ध हत्येचा आरोप केला होता. मुलाच्या मृत्यूला एन्काउंटर म्हणता येणार नाही, असं म्हणत त्यांनी न्यायालयाकडे सखोल चौकशीची मागणी केली होती.

याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने केवळ गुन्हा दाखल करण्याचे आदेशच दिले नाहीत, तर या प्रकरणाचा सखोल तपासही करण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारवर आणि पोलिस यंत्रणेवर या प्रकरणात कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे.

Title : Akshay Shinde Encounter Case Parents Missing 

 

Join WhatsApp Group

Join Now