“अक्षयचा एन्काऊंटर पैसे घेऊन केला, त्याच्या खिशात..”, वडिलांचा खळबळजनक आरोप

On: September 24, 2024 11:27 AM
Akshay Shinde Encounter
---Advertisement---

Akshay Shinde Encounter l बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी एक धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. यावेळी या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केल्याची घटना घडल्यानंतर त्यानी पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र आता अक्षयच्या आई वडिलांनी पोलिसांवर धक्कादायक आरोप केले आहेत.

अक्षय शिंदेचे आई वडिल काय म्हणाले? :

“या प्रकरणात आणखी सहाजण आरोपी आहेत. पोलिसांनी त्यांना शोधलं नाही आणि आमच्या पोराला मारुन टाकलं आहे. मात्र त्यांना वाचवण्यासाठीच आमच्या पोराला मारण्यात आले आहे. तसेच आम्ही सध्या स्टेशनवर कचऱ्यात राहतो, तिथेच झोपतो. पोलिसांनी अक्षयला पकडून नेलं, तेव्हापासून आम्ही फरार आहोत, मीडियासमोर आलो नाही.

मात्र याप्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. तेव्हाच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ. अन्यथा आम्हालाही गोळ्या घालून ठार मारा, आम्ही मरायला देखील तयार आहोत असे अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे.

Akshay Shinde Encounter l पोलिसांवर केले मोठे आरोप :

याशिवाय अक्षयने मला जेलमध्ये एक मोठा पेपर देखील दाखवला होता. यामध्ये काय आहे वाचून बघ असे तो मला म्हणाला होता. पण मला वाचता येत नसल्याने तो पेपर अक्षयच्या खिशात ठेवला होता. त्यामध्ये काय लिहलं होतं, हे मला माहिती नाही. मात्र, पोलिसांनीच तो पेपर मुद्दाम अक्षयच्या खिशात ठेवला असणार आहे.

तसेच त्या लोकांनीच मुद्दाम,हा पोरगा असं करुन घेणार असं काहीतरी कागदावर लिहून, तो अक्षयच्या खिशात ठेवला असावा. तसेच त्या लोकांना अक्षयला मारायचं होतंच, म्हणूनच त्याच्या खिशात ती चिट्ठी ठेवली असेल. तसेच पोलीस आता खोटं बोलत आहेत. कारण त्यांना कोणीतरी पैसे दिले आहेत”, असा आरोप अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केला आहे.

News Title : Bigg Boss Marathi 5 Grand Finale

महत्वाच्या बातम्या –

बिग बॉस मराठी 5 चा महाअंतिम सोहळा ‘या’ दिवशी पार पडणार!

“मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काऊंटर”; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

एन्काऊंटरआधी अक्षयचे शेवटचे शब्द काय होते?, आईने केला मोठा खुलासा

“मृतदेह ताब्यात घेणार नाही..”; अक्षय शिंदेच्या आईचे पोलिसांवरच गंभीर आरोप

“…तेव्हाच खऱ्या अर्थाने बदला पूर्ण होईल”, अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now