अक्षय कुमारने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क; म्हणाला आपला भारत नेहमीच….

On: May 20, 2024 1:54 PM
akshay Kumar Voting
---Advertisement---

Akshay Kumar | अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) भारताचे नागरिकत्व मिळालं आहे. याचा फायदा त्याला यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला घेता आला आहे. आज पाचव्या टप्प्यात देशात 49 तर राज्यात 13 जागांवर मतदान सुरू आहे. त्यापैकी मुंबईमध्ये सहा जागांवर लोकसभा मतदान सुरू आहे. यावेळी अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केलं आहे.

अक्षय कुमारने सकाळी 7 वाजता केलं मतदान :

अक्षय कुमारने (Akshay Kumar) सकाळी सात वाजता मतदान केलं आहे. त्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूरने देखील मतदान केलं आहे. माझा भारत मजबूत आणि विकासित व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. हिच गोष्ट लक्षात ठेऊन मतदान करावं. यावेळी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी लोकं घराबाहेर येताना दिसत आहेत. मी सकाळी सात वाजता मतदान केलं त्यावेळी 500 लोकं मतदान केंद्रावर होती असं अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणाला आहे.

अक्षय कुमारने भारतीय नागरिकत्व मिळवलं :

अक्षय कुमारने भारतीय नागरिकत्व मिळवलं आहे. त्यानंतर त्याचं हे पहिलं मतदान आहे. अक्षय कुमारसह इतर सेलिब्रिटी मतदान केंद्रावर मतदान करताना दिसत आहेत. अभिनेता अक्षय कुमार आणि जान्हवी कपूर यांना मतदान केंद्राबाहेर स्पॉट करण्यात आलं आहे.

मुंबईमधील लोकसभा निवडणुकीकडे केवळ राज्याचं नाहीतर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मुंबई हे लोकसभा निवडणुकीचं केंद्रस्थान आहे. मुंबई येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रचारसभा घेतल्या होत्या. मुंबई मिळवणे हे एक भाजपचे उद्दिष्टे असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

मुंबईत मतदान असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडत आहेत. अभिनेता फरहान अख्तर, अनिल अंबानी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

News Title – Akshay Kumar First Voting In Mumbai

महत्त्वाच्या बातम्या-

दुःखद घटना; राष्ट्राध्यक्षांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

फोर्ड कंपनी बाजारात धुमाकूळ घालणार; नवीन SUV कारची एंट्री

महत्वाची बातमी! हवामान विभागाने मान्सूनबाबत दिली महत्त्वाची अपडेट

राज्यातील ‘या’ दिग्गजांचं भवितव्य आज ठरणार! लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा कसा असणार?

आज या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता

Join WhatsApp Group

Join Now