पैठणी आणि बिकिनी ब्लाऊज? आकांक्षा पुरीचा ‘तो’ अवतार पाहून नेटकरी भडकले

On: April 8, 2026 2:56 PM
Akanksha Puri
---Advertisement---

Akanksha Puri | महाराष्ट्राची शान मानली जाणारी पैठणी साडी आणि तिच्यासोबत बिकिनी स्टाईल ब्लाऊज असा अनोखा पेहराव केल्यामुळे अभिनेत्री आकांक्षा पुरी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. पारंपरिक पैठणी साडीला आधुनिक फॅशनचा टच देण्याचा हा प्रयत्न काहींना आवडला असला, तरी अनेकांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या लूकमुळे आकांक्षा पुरीला (Akanksha Puri) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. (Akanksha Puri Paithani Saree Controversy)

पैठणी साडी ही महाराष्ट्रातील महिलांच्या आवडीचा पारंपरिक पोशाख मानली जाते. साडी, नथ, दागिने आणि साजेसा ब्लाऊज असा संपूर्ण पेहराव पैठणीचे सौंदर्य अधिक खुलवतो. मात्र याच पैठणीसोबत बिकिनी स्टाईल ब्लाऊज परिधान केल्यामुळे अनेकांनी हा प्रकार संस्कृतीचा अपमान असल्याची टीका केली.

फॅशन शोमधील लूक ठरला चर्चेचा विषय :

काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या ‘बॉम्बे टाइम्स फॅशन वीक’मध्ये डिझायनर रोहित वर्मा यांच्या शोमध्ये आकांक्षा पुरीने पाहुणी म्हणून उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात अभिनेत्री बिपाशा बसू शोस्टॉपर होती. मात्र, कार्यक्रमादरम्यान आकांक्षा पुरीच्या पेहरावानेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Akanksha Puri Paithani Saree Controversy)

या फॅशन शोसाठी आकांक्षाने पारंपरिक पैठणी साडी परिधान केली होती. पण त्यासोबत तिने बिकिनी स्टाईल ब्लाऊज घातल्याने सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. काहींनी तिच्या फिटनेस आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले, तर अनेकांनी तिच्या फॅशन सेन्सवर प्रश्न उपस्थित करत तीव्र टीका केली.

Akanksha Puri | ट्रोलिंगवर आकांक्षा पुरीची प्रतिक्रिया :

दरम्यान, या वादावर आकांक्षा पुरीनेही (Akanksha Puri) प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत बोलताना तिने सांगितले की, जिथे कौतुक असते तिथे थोडेफार ट्रोलिंगही होतच असते. त्यामुळे ती ट्रोलर्सकडे फारसे लक्ष देत नाही आणि सकारात्मक प्रतिक्रियांवरच लक्ष केंद्रित करते.

आकांक्षा पुरीने पुढे स्पष्ट केले की हा लूक तिची वैयक्तिक निवड नव्हती. हा संपूर्ण पोशाख प्रसिद्ध डिझायनर रोहित वर्मा यांनी खास डिझाइन केला होता. एक कलाकार म्हणून डिझायनरच्या कल्पनेचा आदर करून तिने आत्मविश्वासाने हा लूक साकारल्याचेही तिने सांगितले.

News Title: Akanksha Puri Paithani Saree Bikini Blouse Controversy Sparks Debate on Social Media

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now