Ajit Pawar Death | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा बुधवारी झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेक तपशील हळूहळू समोर येत असून, अपघाताच्या काही वेळ आधी त्यांनी केलेला शेवटचा फोन कॉल विशेष चर्चेत आहे. त्या कॉलमधून कोणाशी संवाद साधला गेला होता, याबाबत महत्त्वाची माहिती आता उघड झाली आहे. (Ajit Pawar last phone call)
बारामतीजवळ लँडिंगवेळी भीषण दुर्घटना :
मुंबईहून बारामतीकडे निघालेलं हे विमान बुधवारी सकाळी सुमारे 8.45 वाजता लँडिंगच्या प्रक्रियेत असताना अपघातग्रस्त झालं. बारामती विमानतळाच्या जवळपास सुमारे 500 फूट उंचीवर असतानाच विमान दरीसदृश परिसरात कोसळल्याची माहिती आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमानाने दोन वेळा राउंड घेतल्याचं आणि उतरताना अचानक क्रॅश झाल्याचं स्पष्ट दिसत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. (Ajit Pawar CCTV)
विमान जमिनीवर आदळताच परिसरात मोठे धुराचे लोट उठले आणि काही क्षणांतच आग लागल्याचं दिसून आलं. हे विमान एका शेतात कोसळल्याची माहिती समोर आली असून, या घटनेचे अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दुर्घटनेमुळे राज्यभर शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Ajit Pawar Death | अपघातापूर्वी झालेला शेवटचा संवाद :
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात होण्यापूर्वी अजित पवार (Ajit Pawar Death) यांनी भाजप नेते राणाजगजितसिंह पाटील (Rana Jagjitsingh Patil) यांना फोन केला होता. हा कॉल विमानात बसण्याआधी झाल्याचं सांगितलं जात असून, बारामतीत उतरल्यावर पुन्हा संपर्क साधण्याचा त्यांचा विचार होता, असंही समजतं आहे. मात्र या सर्व बाबींना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या फोन कॉलच्या माहितीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अपघाताच्या आधीच्या क्षणांबाबत अधिक तपशील तपास यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भीषण घटनेनंतर अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.






