Shrirang Barne | मावळमधून शिवसेनेनं 2009 च्या निवडणुकीत पहिल्यांदा विजय मिळवल्यापासून 2019 पर्यंत विजयाचा सिलसिला कायम ठेवला आहे. मात्र यावेळी दोन्ही शिवसेना आमने-सामने आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरंग बारणे (Shrirang Barne) आणि दुसरे उद्धव ठाकरे, ज्यांचे उमेदवार संजोग वाघेरे आहेत.
दोन उमेदवारांमधील लढाई केवळ खासदार होण्यासाठी नसून या मतदारसंघातील मतदार कोणाच्या बाजूने आहेत आणि या दोघांपैकी खरी शिवसेना कोणाची, हे पाहण्याची आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची बाजू घेणारे विद्यमान खासदार बारणे (Shrirang Barne) तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी बारणेंकडून दणक्यात प्रचार करण्यात आला. मात्र प्रचारादरम्यान ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांना अजित पवार यांचा आशीर्वाद असल्याची कुजबूज मावळमध्ये सुरू होती. मात्र मावळमध्ये झालेल्या सभेत अजित पवारांनी हा दावा हाणून पाडला.
बारणेंसाठी अजित पवारांची फिल्डिंग
बारणेंना चांगला लीड मिळावा यासाठी अजित पवारांनी फिल्डिंग लावल्याचंही पाहायला मिळालं. श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी अजित पवारांनी सुनील शेळके, शंकर जगताप यांना दिली आहे. अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची राहिल. अजित पवार यांनी मावळात धनुष्यबाण चालवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आहे- सुनील शेळके
अजितदादांनी सांगितला फोटोचा किस्सा
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलीचा विवाह पार पडला. त्यावेळी श्रीरंग बारणे यांच्याविरोधी असणारे ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे माझ्यावर लक्ष ठेवूनच उभे होते. मी स्टेजवर गेलो अन गड्याने पाय धरले. फोटो काढला अन दादांनी आशीर्वाद दिले, असा प्रचार त्यांनी सुरू केला, असं अजित पवार यांनी सांगत आपल्याला बारणेंनाच निवडून आणयचं आहे, असं आवाहन त्यांनी मावळच्या मतदारांना केलं.
वाघेरेंना छुपा पाठिंबा नाही
वाघेरे अजित पवारांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते. मात्र तिकीट मिळवण्यासाठी वाघेरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे अजित पवारांनीच त्यांना पाठवल्याची चर्चा सुरू होती. मात्र अजित पवारांनी या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे ही अफवा वाघरेंच्या गोटातून पसरवण्यात आल्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या भूमिकेमुळे वाघेरेंना छुपा पाठिंबा नाही तर अजित पवार बारणेंच्या पाठिशी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मी शब्दाचा पक्का आहे. एकदा शब्द दिला की कोणाच्या बापाचं ऐकत नाही. मी मॅच फिक्सिंग करत नाही, असं म्हणत अजित पवारांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“राज ठाकरेंना आताच एवढा पुळका का?, भाजपची राज ठाकरेंनाही धमकी?”
पुढील चार दिवस धोक्याचे; पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट
प्रज्वल रेवन्नानंतर भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, राजकारणात खळबळ
कंड जिरवेन म्हणणाऱ्या अजित पवारांना निलेश लंकेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
ट्विटर X च्या माध्यमातून लाखो रुपये कमवता येणार; एलॉन मस्क यांची नवी घोषणा काय?






