पुण्यातील ‘तो’ उड्डाणपूल निकृष्ट? अजितदादा प्रचंड आक्रमक

On: December 16, 2025 1:25 PM
Pune Flyover News
---Advertisement---

Pune Flyover News | पुणे शहरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांच्या रचनेवरून पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील उड्डाणपुलांच्या चुकीच्या नियोजनावरून अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले पूल वाहतूक कोंडी कमी करण्याऐवजी नव्या अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप नागरिकांकडून सातत्याने केला जात आहे. (Sinhagad Road Flyover)

पुण्यातील पाटील इस्टेट, हडपसर, नॉन-स्टॉप उड्डाणपूल, सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोरील पूल आणि ई-स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल याबाबत पूर्वीही नियोजन चुकल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. विशेष म्हणजे यातील अनेक पूल अजित पवार यांच्या पालकमंत्रीपदाच्या काळातच उभारण्यात आले होते. त्यामुळे आज केवळ इंजिनियर्सवर जबाबदारी टाकली जात आहे का, असा प्रश्न पुणेकरांमधून उपस्थित होत आहे.

सिंहगड रोड उड्डाणपुलावरच हातोडा :

अजित पवार यांचा संताप मुख्यतः सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाबाबत व्यक्त झाला आहे. हा उड्डाणपूल मेट्रो प्रकल्पासाठी तब्बल ६६ ठिकाणी तोडण्याचा प्रस्ताव असल्याने पुन्हा एकदा पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. विशेष म्हणजे याच पुलाचे उद्घाटन काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले होते. (Pune Flyover News)

११८ कोटी रुपये खर्च करून उभारलेला हा पूल आता मेट्रोसाठी तोडावा लागणार असून त्यासाठी अतिरिक्त २६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. उड्डाणपूल आणि मेट्रो या दोन्ही प्रकल्पांचे एकत्रित नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट होत आहे. यावरून अजित पवारांनी थेट नियोजन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Pune Flyover News | मेट्रो परवानगी आणि चुकीचे नियोजन :

२०२१ मध्ये पुणे महापालिकेने सिंहगड रोड उड्डाणपुलाला (Sinhagad Road Flyover) मान्यता दिली होती. त्यावेळी या मार्गावर मेट्रो प्रकल्प येणार का, अशी विचारणा मेट्रो प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र त्या वेळी मेट्रोकडून नकारात्मक उत्तर देण्यात आले होते. त्यानंतर काहीच दिवसांत खडकवासला पर्यंत मेट्रोला परवानगी देण्यात आली आणि उड्डाणपुलाचे काम सुरू झाले होते.

आता नियोजित मेट्रो मार्ग सिंहगड रस्त्यावरूनच जाणार असल्याने उड्डाणपुलाच्या मधोमध मेट्रोचे खांब उभारावे लागणार आहेत. त्यामुळे पुलाची रुंदी कमी होणार असून ६६ ठिकाणी तोडफोड करावी लागणार आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असून, या चुकांची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

News Title: Ajit Pawar Slams Flyover Planning in Pune, Questions Responsibility Over Sinhagad Road Bridge

पुणे उड्डाणपूल बातमी, अजित पवार संताप, सिंहगड रोड उड्डाणपूल, पुणे मेट्रो अपडेट, पुणे वाहतूक कोंडी
Pune Flyover News, Ajit Pawar Angry, Sinhagad Road Flyover, Pune Metro Project

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now