‘फुले’ चित्रपटाच्या वादावर अजित पवारांनी केले मोठे भाष्य!

On: April 11, 2025 9:57 AM
Phule Movie Controversy
---Advertisement---

Phule Movie Controversy l महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘फुले’ या (phule movie) चित्रपटावर सध्या वाद सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, कोणताही चित्रपट समाजात तेढ निर्माण करणार नाही याची काळजी सरकार घेईल. या वक्तव्यात त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ चित्रपटाचं उदाहरण देत ‘फुले’ चित्रपटासंदर्भात भूमिका मांडली.

‘फुले’ चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी (pratik gandhi) महात्मा फुलेंच्या भूमिकेत, तर पत्रलेखा सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले असून, त्यात फुलेंच्या समाजसुधारणेच्या लढ्याचं प्रभावी चित्रण करण्यात आलं आहे. मात्र, ब्राह्मण महासंघासह काही संघटनांनी त्यातील संवाद व दृश्यांवर आक्षेप घेतल्याने सेन्सॉर बोर्डानेही काही बदल सुचवले.

“सेन्सॉर बोर्ड शहानिशा करते, आमची जबाबदारी समाजात एकोपा ठेवणे” – अजित पवार :

अजित पवार (ajit pawar) म्हणाले, “चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्ड त्याची तपासणी करतो. या समितीत मान्यवर सदस्य असतात. त्यानंतरच चित्रपट प्रदर्शित केला जातो. पद्मावतच्या वेळीही वाद झाले, नाव बदलून तो प्रदर्शित झाला. तेव्हा देखील काही गटांचा विरोध होता.” त्यांनी असेही नमूद केले की, लोकशाहीत विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु समाजात तेढ निर्माण होऊ नये, याची जबाबदारी शासनाची आहे.

‘फुले’ चित्रपटावरून उठलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते जयंत पाटील (jayant patil) यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सेन्सॉर बोर्डावर थेट टीका केली आहे. “काश्मीर फाइल्स, केरळ फाइल्स यांच्यावर आक्षेप घेतला जात नाही, पण ‘फुले’सारख्या चित्रपटावर आक्षेप का घेतले जातात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Phule Movie Controversy l “सेन्सॉर बोर्डात कोण बसतात हेच प्रश्नचिन्ह” – जयंत पाटील :

जयंत पाटील म्हणाले, “’Who is Namdeo Dhasal?’ असा प्रश्न विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या विद्वानांबद्दल शंका उपस्थित होते. ‘फुले’ चित्रपट व समाजसुधारकांच्या विचारांना रोखण्याचं काम सुरू आहे, असं चित्र दिसतंय.” त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर आक्षेप घेत, केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

दरम्यान, चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार अजूनही चित्रपट प्रदर्शित होईल यावर ठाम आहेत. सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या सूचनांनुसार चित्रपटात बदल करून लवकरच प्रदर्शित करण्याची शक्यता आहे. वाद कितीही असले तरी फुलेंच्या कार्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा अशी अनेकांची अपेक्षा आहे.

News Title: Ajit Pawar Reacts to ‘Phule’ Movie Controversy, Cites Padmaavat Example

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now