राजकारणात खळबळ! अजित पवारांच्या विमानाबाबत खळबळजनक माहिती समोर

On: February 22, 2026 11:41 AM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar Plane Crash | अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना झालेल्या या भीषण दुर्घटनेत त्यांचे निधन झाले. आता या प्रकरणाशी संबंधित आणखी धक्कादायक माहिती समोर येत असून त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख होत आहे. (Ajit Pawar Plane Crash News)

अपघाताची संपूर्ण घटनाक्रम :

28 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी 8 वाजता मुंबई विमानतळावरून VSR कंपनीचे विमान उड्डाण केले. मात्र अवघ्या 45 मिनिटांत, म्हणजे सुमारे 8.45 वाजता, बारामती विमानतळाच्या जवळच विमान कोसळले. सुरुवातीला अपघातात ते गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली होती, परंतु काही वेळातच त्यांच्या निधनाची अधिकृत बातमी समोर आली. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. (VSR company aircraft)

अपघातानंतरच्या व्हिडिओंनी राज्यभरात धक्का बसला. अनेकांना अजूनही त्यांच्या जाण्याचा विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या घटनेनंतर काही तासांतच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, असे स्पष्ट केले, त्यामुळे पवार कुटुंबातील मतभेदही चर्चेत आले.

Ajit Pawar Plane Crash | VSR विमान कंपनी आणि फडणवीस यांचा संदर्भ :

या दुर्घटनेनंतर आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ज्या VSR कंपनीच्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्याच कंपनीच्या विमानाचा वापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही केला होता. 26 ऑक्टोबर रोजी फलटणचे रणजीत सिंह निंबाळकर (Ranjit Singh Nimbalkar) यांच्या कार्यक्रमासाठी ते बारामती येथे याच कंपनीच्या विमानाने आले होते. त्यांच्या आगमनानंतरचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल झाले आहे.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री त्याच विमानाने मुंबईकडे परतले होते. दरम्यान, रोहित पवार (Rohit Pawar) यांनी VSR कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. केवळ अजित पवारच नव्हे, तर राज्य आणि देशातील अनेक नेते या कंपनीच्या विमानातून प्रवास करत असल्याचेही समोर आले आहे. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ झालेल्या या भीषण अपघातामुळे आता VSR कंपनीच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

News title : Ajit Pawar Plane Crash Revelation

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now