अजित पवारांच्या अपघात प्रकरणी मोठी माहिती समोर!

On: February 6, 2026 12:06 PM
Ajit Pawar plane crash
---Advertisement---

Ajit Pawar plane crash | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोक आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातामागे तांत्रिक बिघाड की मानवी चूक, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सरकारकडून सीआयडी (CID) मार्फत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. आता या तपासात नवी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

धावपट्टीजवळ झालेला भीषण अपघात :

मुंबई (Mumbai) येथून बारामती (Baramati) कडे जात असताना अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाच्या (Baramati Airport) धावपट्टीजवळ कोसळले. सुरुवातीला अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र काही क्षणांतच विमान जमिनीवर आदळल्यानंतर चार ते पाच मोठे स्फोट झाले आणि विमानातील सर्व जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला.

प्राथमिक अहवालानुसार, या अपघातामागे विमानातील तांत्रिक बिघाड किंवा वैमानिकाचा अंदाज चुकणे ही दोन प्रमुख कारणे असू शकतात. मात्र, अद्याप अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विमान धावपट्टीपासून काही अंतरावर असताना अचानक एका बाजूला झुकताना दिसले होते. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, अनेक नेत्यांनी या दुर्घटनेबाबत संशयही व्यक्त केला आहे.

Ajit Pawar plane crash | सीआयडी चौकशी आणि खासगी सचिवांची भूमिका :

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी सरकारने सीआयडीची स्थापना केली आहे. तपास यंत्रणा प्रत्येक शक्य कोनातून या दुर्घटनेचा अभ्यास करत असून, अपघातामागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या चौकशीदरम्यान आता अजित पवार यांच्या खासगी सचिवांची चौकशी करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सीआयडी अधिकाऱ्यांनी खासगी सचिवांकडे अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याचे संपूर्ण नियोजन तपासले आहे. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार कुठे जाणार होते, कोणत्या बैठका नियोजित होत्या आणि त्यांचा प्रवास कसा आखण्यात आला होता, याची सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच 27 जानेवारीच्या रात्री या दौऱ्याबाबत अजित पवार यांनी काही चर्चा केली होती का, यासंदर्भातही सचिवांना प्रश्न विचारण्यात आले. (Ajit Pawar plane crash)

याशिवाय, 28 जानेवारी रोजीच्या प्रवासाचे नियोजन नेमके कोणी केले, विमान प्रवासासाठी कोणती तयारी करण्यात आली होती आणि अंतिम निर्णय कोणी घेतला होता, यावरही चौकशी सुरू आहे. सीआयडी अधिकारी सर्व शक्यता तपासत असून, या अपघातामागे काही वेगळे कारण तर नाही ना, याचा शोध घेत आहेत.

News Title: Ajit Pawar Plane Crash Probe Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now