केबल तोडली, फोन फ्लाईट मोडवर…; अजितदादांच्या आईपासून निधनाची बातमी अशाप्रकारे लपवली!

On: January 29, 2026 10:09 AM
Ashatai Pawar
---Advertisement---

Ashatai Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर त्यांच्या फार्महाऊसवरील एक मन सुन्न करणारा प्रसंग समोर आला असून, अजित पवार यांच्या आई आशाताई पवार सकाळच्या सुमारास टीव्ही पाहत असतानाच अपघाताची बातमी प्रसारित झाली होती. त्या क्षणी फार्महाऊसवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्येही एकच गोंधळ उडाला होता. (Ajit Pawar Death)

अचानक आलेल्या या बातमीमुळे आशाताईंना काही तरी गंभीर घडल्याची शंका आली होती. मात्र सुरुवातीला त्यांना केवळ किरकोळ अपघात झाला असावा, असे वाटले. तरीही त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आणि त्या लगेच दादांची विचारपूस करू लागल्या, असे फार्महाऊस मॅनेजर संपत धायगुडे यांनी सांगितले.

टीव्हीची केबल तोडली, फोन फ्लाईट मोडवर :

संपत धायगुडे (Sampat Dhaygude) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास टीव्हीवर अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी येताच फार्महाऊसमधील कर्मचाऱ्यांनी आशाताईंना पुढील माहिती कळू नये म्हणून टीव्हीची केबल तोडली आणि टीव्ही बंद पडल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांचा मोबाईल फोन फ्लाईट मोडवर ठेवण्यात आला, जेणेकरून कुठूनही धक्कादायक बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचू नये.

तरीही आशाताई अस्वस्थ होऊन “दादांना भेटून येऊ या,” असे म्हणत फार्महाऊसच्या बाहेर चालत निघाल्या. ड्रायव्हरने गाडी बिघडल्याचे सांगून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ऐकत नव्हत्या. शेवटी नाईलाजाने त्यांना बारामती येथील बंगल्यावर नेण्यात आले, असे धायगुडे यांनी सांगितले.

Ashatai Pawar | दादांच्या निधनाची बातमी कशी द्यावी, पवार कुटुंबासमोर प्रश्न :

दरम्यान, अजित पवार (Ashatai Pawar) यांच्या निधनाची बातमी शरद पवार यांना कशी द्यावी, यावर पवार कुटुंबीयांमध्ये मोठी अस्वस्थता होती. त्यामुळे सुरुवातीला त्यांना ही माहिती देण्यात आली नव्हती. वैद्यकीय तपासणीसाठी शरद पवार यांना रुग्णालयात नेण्यात आले होते, त्यानंतर घरी परतल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना अजित पवारांच्या अपघाती निधनाची माहिती दिली.

ही बातमी समजताच शरद पवार तात्काळ बारामतीकडे रवाना झाले. या घटनेने संपूर्ण पवार कुटुंबाला जबर धक्का बसला असून, महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

News Title: Ajit Pawar Plane Crash: Mother Watching TV When News Broke, Cable Cut to Stop Shock

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now