हिंजवडीकरांना दिलासा! पुराचा धोका कायमचा संपवण्यासाठी अजित पवारांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय!

On: July 21, 2025 5:50 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Pune Hinjewadi News | पुण्याच्या आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडाकेबाज निर्णय घेतला आहे. परिसरातील ओढ्यांवर झालेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाईचे आदेश देत, त्यांनी प्रशासनाला कठोर भूमिका घ्यायला सांगितली आहे. (Pune Hinjewadi News)

अजित पवार यांनी नुकतीच हिंजवडी परिसराची पाहणी केली आणि याठिकाणी वाढलेल्या नागरी समस्यांबाबत चिंता व्यक्त केली. पावसामुळे बुजलेले ओढे, अडथळलेला पाण्याचा निचरा आणि यामुळे दरवर्षी येणाऱ्या पुराच्या समस्येवर कायमचा उपाय म्हणून त्यांनी या निर्णयांची घोषणा केली.

प्रशासनाला स्पष्ट आदेश; युद्धपातळीवर कारवाई :

उपमुख्यमंत्री पवार यांच्या आदेशानुसार, पुणे जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पीएमआरडीए, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि औद्योगिक विकास महामंडळ यांना हिंजवडी परिसराचे संपूर्ण सर्वेक्षण करून अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यासोबतच, पावसामुळे निर्माण होणाऱ्या जलसाच्याचे नैसर्गिक मार्ग मोकळे ठेवण्यासाठी बुजलेले ओढे पुन्हा प्रवाहित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यामुळे पूरस्थिती टाळली जाईल आणि पाण्याचा निचरा सुलभ होईल, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. (Pune Hinjewadi News)

Pune Hinjewadi News | धोकादायक पूलही पाडले जाणार :

हिंजवडी परिसरातील केवळ अतिक्रमणच नव्हे, तर जुने आणि धोकादायक पूलही प्रशासनाच्या कारवाईच्या टप्प्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

अजित पवार यांनी यासंदर्भात स्पष्ट केले की, “धोकादायक पूल तात्काळ पाडण्यात येतील. त्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळता येतील आणि नागरिकांचे जीवितसुरक्षेचं संरक्षण होईल.” या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

News Title: Ajit Pawar Orders Demolition of Illegal Constructions on Streams in Hinjewadi to Prevent Flooding

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now