अजितदादांनी ‘या’ नेत्याला दिला होता विमानाबद्दल महत्वाचा सल्ला! वाचा सविस्तर

On: January 29, 2026 9:50 AM
Ajit Pawar News
---Advertisement---

Ajit Pawar News | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या आठवणी सांगताना माजी आमदार राजवर्धन कदमबांडे (Rajvardhan Kadambande) भावूक झाले असून अजित पवार यांनी एकदा दिलेला सुरक्षेबाबतचा सल्ला आजही त्यांच्या कानात घुमत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. “राजवर्धन, शक्यतो छोट्या विमानाने प्रवास करू नकोस…” असे शब्द अजित पवार यांनी निवांत क्षणी आपुलकीने सांगितल्याचे त्यांनी आठवले.

अजित पवार जेव्हा धुळे दौऱ्यावर असायचे, तेव्हा ते हमखास राजवर्धन कदमबांडे (Rajvardhan Kadambande) यांच्या घरी जेवायला थांबत असत. अशाच एका भेटीत त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने छोट्या विमानाने प्रवास टाळावा, असा आग्रह केला होता. त्यांच्या त्या साध्या पण काळजीने भरलेल्या शब्दांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.

इतरांना सावध करणारे, पण नियतीने घात केला :

राजवर्धन कदमबांडे यांनी सांगितले की, अजित पवार स्वतःही शक्यतो छोट्या विमानाने प्रवास टाळत असल्याचे सांगायचे. सुरक्षिततेबाबत ते नेहमीच जागरूक असायचे आणि सहकाऱ्यांनाही त्याच पद्धतीने सावध करत असत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ही काळजी आणि माणुसकी आज अनेकांना आठवत आहे.

मात्र नियतीचा खेळ किती विचित्र असतो, याचे हे दुर्दैवी उदाहरण ठरले. ज्या संकटाची त्यांना भीती वाटत होती, त्याच संकटात त्यांचा अचानक अंत झाला. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या जाण्याने कार्यकर्ते आणि सहकारी सैरभैर झाले आहेत.

Ajit Pawar News | आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार :

दरम्यान, दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने बारामतीत दाखल होत आहेत.

काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालयात अजित पवारांचे पार्थिव आणल्यानंतर परिसरात भावनांचा उद्रेक झाला. “अजितदादा अमर रहे”, “अजित पवार परत या” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि कार्यकर्त्यांचे दुःख या घोषणांतून स्पष्टपणे जाणवत होते.

News Title: Ajit Pawar Once Warned a Friend Against Small Aircraft Travel, Says Rajvardhan Kadambande

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now