पुण्यातील ‘या’ उड्डाणपुलाला अजित पवारांचे नाव देणार? मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं विधान!

On: March 8, 2026 2:35 PM
Ajit Pawar Bridge Name
---Advertisement---

Ajit Pawar Bridge Name | पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान या पुलाला अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव देण्याची मागणी पुढे आली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

उड्डाणपुलाच्या नावाबाबत मागणी :

पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी विद्यापीठ चौकात उभारण्यात आलेला दुमजली उड्डाणपूल हा शहरातील महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प मानला जात आहे. या पुलाचे उद्घाटन करताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी विशेष मागणी मांडली. त्यांच्या मते या प्रकल्पाची संकल्पना आणि त्यासाठीचा पाठपुरावा अजित पवार यांनी सातत्याने आणि आक्रमकपणे केला होता. (Pune flyover inauguration)

मोहोळ यांनी सांगितले की, या पुलाच्या उभारणीमागे अजित पवार यांची दूरदृष्टी मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी इच्छा अनेकांची आहे. त्यांच्या या मागणीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या प्रस्तावाला समर्थन दर्शवले. त्यांनी स्पष्ट केले की, पुलाच्या उभारणीसाठी अजित पवार यांनी मोठा पुढाकार घेतला होता आणि त्यामुळे त्यांचे नाव देण्यास ते सहमत आहेत.

Ajit Pawar Bridge Name | कार्यक्रमात भावनिक वातावरण :

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) देखील उपस्थित होत्या. त्यांनी सांगितले की, जुन्या पुलाचे पाडकाम करून नव्या पुलाची उभारणी करण्याचा निर्णय घेताना अजित पवार यांनी अनेक अडचणींचा सामना केला. पुणेकरांच्या सोयीसाठी त्यांनी हा निर्णय घेतला आणि काम सुरळीत पार पडावे यासाठी प्रत्येक टप्प्यावर स्वतः लक्ष ठेवले. (Ajit Pawar Bridge Name)

या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळातील एक आठवण सांगताना भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांनी सांगितले की, कामाची चर्चा करताना अजित पवार यांनी ‘पूल पाडा, पण काम लवकर पूर्ण करा, मला शांत झोप हवी’ असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. त्यांच्या या भूमिकेमुळेच आज हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. तसेच आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनीही सुनेत्रा पवार यांचे कौतुक करत सांगितले की, अजित पवार यांच्या विकासकामांची परंपरा त्या प्रभावीपणे पुढे नेत आहेत.

या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलामुळे आणि मेट्रो मार्गिकेमुळे बाणेर, पाषाण आणि विद्यापीठ रस्त्यांवरील सिग्नलवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या पुलाचे उद्घाटन झाल्याने पुणेकरांमध्ये समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे.

News Title: Ajit Pawar Name For Pune Flyover

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now