Ajinkya Rahane Wealth | भारतीय क्रिकेटमधील शांत आणि संयमी फलंदाज म्हणून ओळखला जाणारा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आज आपला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याला भारतीय संघात संधी मिळालेली नसली तरी देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये तो सातत्याने खेळताना दिसत आहे. मैदानावरील कामगिरीसोबतच त्याची आर्थिक प्रगतीही लक्षवेधी ठरली असून त्याची एकूण मालमत्ता आणि उत्पन्नाचे विविध स्रोत चर्चेचा विषय बनले आहेत.
८० कोटींच्या घरात पोहोचलेली संपत्ती :
क्लासिक फलंदाजी आणि नेतृत्वगुणांसाठी प्रसिद्ध असलेल्या अजिंक्य रहाणेची एकूण संपत्ती २०२५ पर्यंत सुमारे ८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते. त्याच्या उत्पन्नाचा मोठा भाग आयपीएल करार, बीसीसीआय (BCCI) कडून मिळणारे मानधन, जाहिराती तसेच इतर वैयक्तिक व्यावसायिक उपक्रमांमधून येतो. (Ajinkya Rahane Wealth News)
२००८ पासून आयपीएलमध्ये सातत्याने खेळणाऱ्या रहाणेने आपल्या कारकिर्दीत अनेक संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. आतापर्यंत तो सहा वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळला असून या स्पर्धेतून त्याने तब्बल ५६.८४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रत्येक हंगामात त्याच्या मानधनात बदल होत गेले आणि त्यातून त्याची आर्थिक वाढही झाली.
Ajinkya Rahane Wealth | आलिशान घर, महागड्या गाड्या आणि ब्रँड करार :
आयपीएल २०२६ मध्ये रहाणे कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा भाग होता. त्याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. यापूर्वी त्याने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचे कर्णधारपदही भूषवले होते.
रहाणे सध्या मुंबईच्या बांद्रा-वर्ली सी लिंक परिसरातील आलिशान फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहे. समुद्रकिनाऱ्याचे सुंदर दृश्य दिसणारा हा फ्लॅट प्रशस्त लिव्हिंग एरिया आणि अनेक बाल्कनींनी सजलेला आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे Audi Q5, Volvo EX60, Range Rover आणि BMW यांसारख्या लक्झरी गाड्यांचा ताफा आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्याने सुमारे २.९६ कोटी रुपयांची Mercedes Maybach GLS 600 SUV खरेदी केली होती.
तसेच जाहिरातींच्या माध्यमातूनही त्याला मोठी कमाई होते. Adidas, My11Circle, Games24x7, Neo Growth, CEAT, Hero Motocorp आणि Boost यांसारख्या नामांकित ब्रँड्सशी तो जोडलेला असून एका जाहिरातीसाठी तो जवळपास १ कोटी रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील संभाव्य निवृत्तीबाबतही चर्चा सुरू आहे.






