Aishwarya Rai and Abhishek Bachchan | सध्या अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या वैवाहिक आयुष्यातील चर्चांना उधाण आले आहे. मात्र, २००७ साली त्यांच्या लग्नाच्या दिवशीही असाच एक मोठा ड्रामा घडला होता. जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नावाच्या एका मॉडेलने अभिषेक आपला पती असल्याचा दावा करत लग्नात गोंधळ घातला होता, ज्यामुळे बच्चन कुटुंबाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते.
लग्नाच्या दिवशी ‘प्रतिक्षा’ बंगल्याबाहेर नाट्य
अभिषेक आणि ऐश्वर्याच्या (Aishwarya Rai) लग्नाचे विधी ‘प्रतिक्षा’ (Pratiksha) या बंगल्यावर सुरू असताना, मॉडेल जान्हवी कपूर तिथे पोहोचली आणि तिने मोठा हंगामा सुरू केला. ‘अभिषेक माझा पती आहे आणि ऐश्वर्याने तो माझ्याकडून चोरला आहे,’ असा आरडाओरडा केला होता. हे प्रकरण इतके टोकाला गेले की, तिने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिथे एकच खळबळ उडाली.
या घटनेमुळे अनेकांना वाटले की ही श्रीदेवी (Sridevi) आणि बोनी कपूर (Boney Kapoor) यांची मुलगी जान्हवी कपूर आहे, पण तसे नव्हते. ही मॉडेल जान्हवी कपूर होती, जिने अभिषेकसोबत ‘दस’ (Dus) या चित्रपटात काम केले होते. तिच्या या अनपेक्षित आणि नाट्यमय कृत्यामुळे हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले आणि बच्चन कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले.
Aishwarya Rai | खोटा दावा आणि पोलिसांचा हस्तक्षेप
जान्हवीने दावा केला होता की, तिचे आणि अभिषेकचे लग्न आधीच झाले आहे आणि ती त्याची कायदेशीर पत्नी आहे. मात्र, आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ तिच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. लग्नाचे फोटो, प्रमाणपत्र किंवा कोणताही साक्षीदार ती सादर करू शकली नाही. पुराव्यांअभावी पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला.
प्रतिक्षा बंगल्याबाहेर झालेल्या या हाय-व्होल्टेज ड्राम्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. जान्हवीच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य न आढळल्याने आणि तिच्याकडे पुरावे नसल्याने अखेर हे प्रकरण शांत झाले. मात्र, या घटनेची चर्चा अनेक वर्षे बॉलिवूडच्या (Bollywood) वर्तुळात रंगली होती.






