AI Chatbot Romance Scam | ऑनलाइन डेटिंग (Online Dating) करणाऱ्या भारतीयांसाठी धोक्याची सूचना आहे. एका नवीन अहवालानुसार, भारतामध्ये एआय (AI Chatbot Romance Scam) आधारित रोमान्स घोटाळे, फसवी डेटिंग ॲप्स आणि डीपफेक (Deepfake) तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन डेटिंग करणे अधिक धोकादायक होत आहे.
एआय चॅटबॉट्स आणि रोमँटिक भावना
अहवालात असे म्हटले आहे की, ६१ टक्के भारतीयांना एआय चॅटबॉटसोबत बोलताना खऱ्या व्यक्तीशी बोलत असल्यासारखे वाटले आणि त्यांच्या मनात चॅटबॉटबद्दल रोमँटिक भावना निर्माण झाल्या. ५१% लोकांना चॅटबॉट कडून मानवी प्रतिसाद मिळाला.
डीपफेक आणि बनावट प्रोफाइल्समुळे डेटिंगवरील विश्वास कमी झाला आहे, असे ८४% भारतीयांनी सांगितले. तसेच, ६९% भारतीयांनी डेटिंग ॲप्स किंवा सोशल मीडियावर (Social Media) बनावट प्रोफाइल्स पाहिल्याचे नमूद केले. ३४% लोकांना खोटी व्यक्ती किंवा चॅटबॉटने फसवल्याचे लक्षात आले.
ऑनलाइन डेटिंगसाठी सोशल मीडियाचा वापर
भारतात, ९६% भारतीय सोशल मीडियावरून डेटिंगसाठी संपर्क साधतात. या फसवणुकीत, प्रत्येक व्यक्तीचे सरासरी ३,६४,९३९ रुपयांचे नुकसान झाले आहे, तर ३२% लोकांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत. (AI Chatbot Romance Scam)
भारतीय डेटिंगसाठी इंस्टाग्राम (Instagram)(८५%), व्हॉट्सॲप (WhatsApp)(६१%), फेसबुक (Facebook)(५१%), स्नॅपचॅट (Snapchat)(५०%), एक्स (X)(४६%), टेलिग्राम (Telegram)(३६%) आणि जीमेल (Gmail)(३३%) यांसारख्या माध्यमांचा वापर करतात.
Title : AI Chatbot Romance Scams Costing Indians Dearly






