ओवैसींची अहिल्यानगरमध्ये सभा; पोलिसांचा बंदोबस्त आणि कडक अटींसह परवानगी

On: September 30, 2025 4:08 PM
Asaduddin Owaisi Target Devendra Fadnavis
---Advertisement---

Ahilyanagar News | अहिल्यानगरमध्ये काल झालेल्या तणावपूर्ण घटनेनंतर आज AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची सभा होणार आहे. सुरुवातीला या सभेसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र आता कडक अटी व शर्तींसह सभेला परवानगी देण्यात आली आहे.

कालपासून नगरमध्ये तणावाचे वातावरण

अहिल्यानगरमध्ये आज असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावाचे वातावरण आहे. सुरुवातीला पोलिसांनी या सभेस परवानगी नाकारली होती पण नंतर कडक अटी व शर्ती घालत स्थानिक प्रशासनाने आता परवानगी दिली आहे. मुकुंदनगर भागात आयोजित झालेली ही सभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची समजली जात आहे. पक्षीय नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याची तयारी करीत आहेत. मात्र काल घडलेल्या घटनेनंतर या सभेला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान काल दुर्गा माता मिरवणुकीदरम्यान काही समाजकंटकांनी जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य केले. यामुळे अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कोटला परिसरात सुरु असलेले निदर्शने सुरु झाली. पण शांततेत सुरु असलेली निदर्शने अचानकच हिंसक वळणावर गेली. जमावाने दगडफेक केली आणि अनेक वाहनांचे मोठे नुकसान तसेच सात पोलीस कर्मचारी व एक महिला होमगार्ड जखमी झाले. पुढे पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुमारे 39 जणांना ताब्यात घेतले आहे आणि तोफखाना पोलीस ठाण्यात 150 ते 200 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील तपास CCTV आणि इतर व्हिडीओ क्लिप्सच्या आधारे चालू असून अज्ञात आरोपींचा शोधही सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी संशयित लोकांच्या धरपकडीनंतर शहरात थोडी शांतता आल्याची नोंद आहे, तरीही तणावपूर्ण वातावरण कायम आहे आणि ठिकठिकाणी वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कडक अटी शर्तींसह परवानगी

पोलिसांनी सभेला परवानगी देताना अनेक कडक शर्ती घातल्या आहेत.सभेच्या ठिकाणी चारही बाजूंनी सुरक्षा ठेवून स्वतंत्र प्रवेश-द्वारे राखण्याचे आणि सभेनंतर परतण्यासाठी वेगळा मार्ग निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच झेंडे, पोस्टर व बॅनर्ससाठी स्थानिक संस्थेची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल आणि कोणत्याही धर्म वा जातीच्या भावना दुखावतील असे वक्तव्य, गाणी किंवा दाखले वापरू नयेत, असे स्पष्ट सुचित केले गेले आहे. तसेच औवेसीची कालची कोल्हापूर (Kolhapur) मधली सभा हिंदू संघटनांनी होऊ दिली नाही. त्यामुळे नगरमधील घटनेबाबत आणि कोल्हापूर मधील कालच्या सभेबाबत औवेसी काय बोलतात याकडेही सर्वांच्या नजरा आहेत.

News Title :- After yesterday’s violence, Owaisi to hold a rally in Ahmednagar today; police deployment tightened and permission granted with strict conditions

Join WhatsApp Group

Join Now