उद्योगपती अदानी यांना मोठा दणका; ‘या’ 6 कंपन्यांना कारणे दाखवा नोटिस

On: May 3, 2024 6:25 PM
Net Worth 2025
---Advertisement---

Adani Group | हिंडनबर्गमुळे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी चर्चेत आले होते. यावेळी त्यांच्यावर अनेक मोठे आरोप ठेवण्यात आले होते. आता अदानी समूह पुन्हा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. गौतम अदानी यांच्या 6 कंपन्यांना बाजार नियंत्रक सेबीने नोटीस पाठवली आहे.

शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यासंबंधीच्या काही शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुलासा मागवण्यात आला आहे. SEBI ने या समूहातील 6 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या नोटिसमध्ये कंपन्यांनी रिलेटेड पार्टी व्यवहारांच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. अदानी एंटरप्रायझेसने गुरुवारी सांगितलं की, 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीसाठी त्यांना दोन कारणे दाखवा नोटीस मिळाल्या आहेत.

अदानी समूहाला सेबीकडून कारणे दाखवा नोटीस

अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी विल्मार आणि अदानी टोटल गॅस या समूहातील इतर कंपन्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शेअर बाजारात या समूहातील (Adani Group) एकूण 10 कंपन्या सूचीबद्ध आहेत.

कंपनीच्या कायदेशीर सल्लागारानुसार, या नोटीसचा कंपनीवर फार मोठा परिणाम होणार नसल्याचं म्हटलं जातंय. अदानी विल्मार आणि अदानी टोटल गॅस वगळता सर्व कंपन्यांच्या लेखा परीक्षकांनी याबाबत आपलं मत मांडलं आहे.

गेल्यावर्षी अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चच्या एका अहवालाने अदानी अडचणीत सापडले होते. सर्वोच्च न्यायालयाने सेबीला या प्रकरणात अदानी समूहातील कंपन्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. सेबीने ऑगस्ट महिन्यात याविषयीचा एक अहवाल सादर केला होता. त्यातील 17 रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शनची चौकशी करण्यात आली. त्याचा संबंध हिंडनबर्गच्या अहवालाशी होता.

रिलेटेड पार्टी म्हणजे काय?

रिलेटेड पार्टी व्यवहार म्हणजे यापूर्वी दोन कंपन्यांनी आप-आपसात केलेला व्यवहार, दोन कंपन्यांमध्ये पूर्वीपासूनच व्यवहार होत असल्यास त्याला रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन म्हणतात. अदानी समूहाला (Adani Group) पाठवण्यात आलेल्या नोटीसीमध्ये कंपन्यांनी रिलेटेड पार्टी व्यवहारांच्या नियमांचे उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे.

News Title – Adani Group in Trouble SEBI Sends Notices To 6 Companies

महत्त्वाच्या बातम्या –

सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

“स्वतःच्या बिझनेसच्या फायद्यासाठी संसदेत…”; अमोल कोल्हेंच्या आरोपांनी शिरुरच्या राजकारणात खळबळ

“कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का?”; रोहित पवारांचं मोदींना प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यावर अत्यंत गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

महायुतीला पाठिंबा जाहीर करताच अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावरील जप्ती मागे

Join WhatsApp Group

Join Now