Car Accident l मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री पवित्रा जयरामचे कार अपघातात निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हैदराबादच्या मेहबूब नगरजवळ हा अपघात झाला आहे. पवित्राची कार बसला धडकल्याने ही अपघात झाला आहे. हा अपघात इतकी भीषण होती की अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला आहे. पवित्रा यांच्या निधनाचे बातमी कळताच कुटुंबासह फिल्म इंडस्ट्रीत देखील शोककळा पसरली आहे.
अभिनेत्री पवित्रा जयरामचे अपघातात निधन :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, लोकप्रिय तेलुगू व कन्नड टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयरामचे रविवारी कार अपघातात निधन झाले आहे. पवित्राच्या कारला बसने धडक दिली आहे. हा अपघात हैदराबादमध्ये झाल्याने तिथेच तिचा मृत्यू झाला आहे. अभिनेत्री पवित्रा तिची बहीण अपेक्षा, ड्रायव्हर श्रीकांत आणि अभिनेता चंद्रकांत हे कारने प्रवास करत होते. यावेळी हा अपघात झाला आहे.
अभिनेत्री पवित्रा ही ‘त्रिनयनी’ या शोमध्ये प्रसिद्ध झाली होती. मात्र अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेत्री पवित्रा कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील हणाकेरे इथं परतत असताना ही धक्कादायक घटना घडली आहे.
Car Accident l रुग्णालयात तिघांवर उपचार सुरु :
अभिनेत्रीच्या कारच्या ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकाला धडकल्याची माहिती समोर येत आहे. कार दुभाजकाला धडकल्यानंतर एका बसने या कारला धडक दिली. या भीषण अपघातात अभिनेत्री पवित्राचा जागीच मृत्यू झाला तर तिच्याबरोबर असलेले इतर सर्वजण गंभीर जखमी आहेत. त्या सर्वांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
पवित्रा जयरामचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. तिच्या अचानक अपघाती जाण्याने चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. अशातच आता पवित्राचे चाहते सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. यासह अभिनेत्रीच्या निधनाने कन्नड इंडस्ट्रीतील कलाकार देखील शोक व्यक्त करत आहेत.
News Title – Actress Pavitra Jayaram Died In Car Accident Hyderabad
महत्त्वाच्या बातम्या
राजकारणात तापणार! निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली अत्यंत कडू शब्दात टीका
अहमदनगरमध्ये आदल्या रात्री भाजपने पाडला पैशांचा पाऊस; व्हिडीओ समोर
या राशींच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळेल; विरोधकांना धूळ चारणार
“…म्हणून आम्ही राज ठाकरेंना सोबत घेतलं”; मोदींनी सांगितलं कारण






