प्रसिद्ध अभिनेत्यावर आली फुटपाथवर झोपण्याची वेळ? VIDEO शेअर करत म्हणाला…

On: June 19, 2026 11:55 AM
Sunil Grover
---Advertisement---

Actor Sleeping On Footpath | कधी उसाचा रस काढताना, कधी रस्त्यावरील टपरीवर चहा बनवताना, तर कधी इस्त्रीवाल्याच्या दुकानात कपडे इस्त्री करताना दिसलेला अभिनेता आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. यावेळी तो ऋषिकेशमध्ये इतर लोकांसोबत फुटपाथवर झोपलेला दिसला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अभिनेत्यावर फुटपाथवर झोपण्याची वेळ का आली?

आपण बोलत असलेलो हा अभिनेता आहे सुनिल ग्रोव्हर. सुनील ग्रोव्हरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऋषिकेशमधील त्रिवेणी घाट परिसरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो जमिनीवर चादर अंथरून इतर लोकांसोबत निवांत झोपलेला दिसत आहे. त्याच्या शेजारी त्याने आपल्या चपलाही ठेवलेल्या दिसतात. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याने “तारे जमीन पर” असे कॅप्शन दिले आहे.

व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी सुनीलच्या साधेपणाचे भरभरून कौतुक केले आहे. अनेकांनी त्याच्या नम्र आणि साध्या जीवनशैलीचे कौतुक करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने, “एक अद्भुत माणूस आणि माझा आवडता कलाकार,” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने, “म्हणूनच लोक तुझ्यावर इतकं प्रेम करतात,” असे म्हटले आहे. आणखी एका युजरने, “तो किती साधा आणि जमिनीशी जोडलेला माणूस आहे,” असे लिहिले.

चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव

एका चाहत्याने तर, “माझ्याकडे एकच हृदय आहे, ते किती वेळा जिंकणार?” अशी भावनिक प्रतिक्रिया दिली. तर काहींनी प्रचंड प्रसिद्धी आणि यश मिळूनही त्याच्यात अहंकाराचा लवलेश नसल्याचे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

सुनील ग्रोव्हरने आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. सध्या तो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये विविध सेलिब्रिटींची मिमिक्री आणि विनोदी पात्रांमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अभिनेता आणि लोकप्रिय विनोदी कलाकार सुनील ग्रोव्हर आपल्या भन्नाट अभिनयामुळे आणि अचूक मिमिक्रीमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. मात्र केवळ पडद्यावरच नव्हे, तर आपल्या साध्या आणि जमिनीशी जोडलेल्या स्वभावामुळेही तो नेहमी चर्चेत असतो. अनेकदा तो अशा गोष्टी करताना दिसतो की, ज्यामुळे चाहतेच नव्हे तर सेलिब्रिटीही आश्चर्यचकित होतात.

कादर खान, आमिर खान, डोनाल्ड ट्रम्प, गुलजार, जावेद अख्तर आणि सलमान खान यांच्यासह अनेक व्यक्तींची त्याने साकारलेली रूपे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. मात्र पडद्यावरील लोकप्रियतेइतकाच त्याचा साधेपणा आणि सामान्य माणसासारखे जगण्याचा दृष्टिकोन चाहत्यांच्या मनात त्याच्याविषयी विशेष आदर निर्माण करतो.

News Title: Actor Sleeping on footpath Sunil Grover Rishikesh video viral

Join WhatsApp Group

Join Now