Action Thriller Movie | ओटीटीवर दर आठवड्याला नवे चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. मात्र, क्वचितच एखादा चित्रपट असा असतो, जो रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आणि थेट ट्रेंडिंग यादीत स्थान मिळवतो. सध्या जिओहॉटस्टारवर अशीच एका अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने ट्रेंडिंग यादीत रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ लाही मागे टाकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या चित्रपटाचे नाव ‘थानाल’ (Thanal) आहे. अवघ्या दोन तासांच्या कालावधीचा हा अॅक्शन-थ्रिलर सध्या जिओहॉटस्टारच्या ट्रेंडिंग यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. दमदार अॅक्शन, सस्पेन्स आणि वेगवान कथानकामुळे सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे.
काय आहे ‘थानाल’ची कथा?
‘थानाल’ची कथा एका पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरते. इतर अधिकाऱ्यांकडून झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी तो एका धोकादायक मिशनवर निघतो. या प्रवासात त्याच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहतात, तर कथेत एकामागून एक धक्कादायक रहस्ये उलगडत जातात. त्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवतो.
चित्रपटातील अॅक्शन सिक्वेन्स, पोलीस आणि गुन्हेगारांमधील थरारक पाठलाग तसेच क्लायमॅक्समधील अनपेक्षित ट्विस्ट ही या चित्रपटाची जमेची बाजू मानली जात आहे.
दमदार स्टारकास्ट
‘थानाल’मध्ये अथर्वा, अश्विन काकुमानू आणि लावण्या त्रिपाठी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तिन्ही कलाकारांच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र माधव यांनी केले आहे.
‘धुरंधर’सह अनेक लोकप्रिय टायटल्सना मागे टाकलं
जिओहॉटस्टारच्या ट्रेंडिंग यादीत ‘थानाल’ने ‘धुरंधर’, ‘रिसॉर्ट’, ‘हाऊस ऑफ ड्रॅगन्स’ आणि ‘इशा’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांनाही मागे टाकले आहे. सध्या हा चित्रपट टॉप-10 यादीत सहाव्या स्थानावर ट्रेंड करत असून, प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटाला IMDb वर 5.3 रेटिंग मिळाले आहे. अॅक्शन आणि थ्रिलर प्रकारातील चित्रपट आवडणाऱ्यांसाठी ‘थानाल’ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
News Title: Action Thriller Movie Thanal JioHotstar Trending






