अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक; जंतरमंतरवरील आंदोलनात मोठा गोंधळ

On: July 18, 2026 3:13 PM
Abhijit Dipke
---Advertisement---

Abhijit Dipke Ink Attack | राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनातील नाट्यमय घडामोडी आणि तणाव क्षणाक्षणाला वाढत चालला आहे. शिक्षण व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना शनिवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी प्रकृती खालावल्याचे कारण देत बळजबरीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर, आता त्यांच्या वैद्यकीय उपचारांवरून आणि आंदोलनस्थळी झालेल्या नव्या हल्ल्यामुळे जंतर-मंतरवर पुन्हा एकदा प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोनम वांगचुक यांच्या उपचारांना पत्नीचा नकार; ‘सलाईन किंवा औषधे देऊ नका’

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून अत्यंत महत्त्वाची आणि आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नीने रुग्णालयात प्रशासनाशी संवाद साधताना त्यांना सलाईन (Saline) किंवा कोणतेही वैद्यकीय उपचार देण्यास स्पष्ट शब्दांत विरोध केला आहे.

त्यांनी दावा केला आहे की, “सोनम वांगचुक यांची प्रकृती सध्या पूर्णपणे ठीक आहे. त्यामुळे माझ्या लेखी परवानगीशिवाय त्यांना रुग्णालयात कोणतेही औषध किंवा सलाईन दिले जाऊ नये.” डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले असले, तरी कुटुंबीयांनी सरकारच्या या वैद्यकीय कारवाईवर संशय व्यक्त केल्याने आता रुग्णालयातील कायदेशीर आणि वैद्यकीय गुंतागुंत वाढली आहे.

आंदोलन पुढे नेणारे अभिजित दिपके यांच्यावर महिलेकडून शाईफेक

दुसरीकडे, सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) सर्वोसर्वा अभिजित दिपके (Abhijit Dipke) यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आपल्या हाती घेतली होती. वांगचुक यांच्या अनुपस्थितीतही हे आंदोलन अधिक तीव्रतेने पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता.

मात्र, शनिवारी दुपारी अभिजित दिपके हे आंदोलनस्थळी उपस्थित माध्यम प्रतिनिधी आणि इतर आंदोलकांशी संवाद साधत असताना, तिथे अचानक आलेल्या एका अज्ञात महिलेने त्यांच्या तोंडावर आणि अंगावर काळी शाई फेकली (Ink Attack). ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यात थेट कैद झाली आहे. या अनपेक्षित शाईफेकीच्या हल्ल्यामुळे जंतर-मंतरवर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून, काही काळ तिथे तीव्र घोषणाबाजी आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

सुरक्षा व्यवस्थेत वाढ; २० जुलैच्या संसद मार्चपूर्वी वातावरण तापले

या नव्या घडामोडींमुळे जंतर-मंतरवरील आंदोलनाला आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून मोठी प्रसिद्धी मिळत आहे. एका बाजूला वांगचुक यांच्या उपचारांना झालेला कौटुंबिक विरोध आणि दुसऱ्या बाजूला सीजेपी (CJP) प्रमुख अभिजित दिपके यांच्यावर झालेला शाईफेक हल्ला, या दोन्ही घटनांमुळे दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आगामी २० जुलै रोजी होणाऱ्या “चलो संसद” (Chalo Sansad) महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी संपूर्ण जंतर-मंतर परिसराची तटबंदी केली असून, सुरक्षा यंत्रणांना हाय-अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.

News Title: Abhijit Dipke Ink Attack Sonam Wangchuk Hospital Update

Join WhatsApp Group

Join Now