अभिजीत दिपके यांच्या बहिणीचे गंभीर आरोप; प्रकरणाला नवे वळण, थेट राष्ट्रपती भवनात धडकले पत्र!

On: July 25, 2026 11:29 AM
Abhijeet Dipke
---Advertisement---

Abhijeet Dipke | दिल्ली येथील जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यानचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांच्या सुरक्षेबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अभिजीत यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत त्यांच्या बहिणीने थेट राष्ट्रपतींकडे निवेदन सादर केले असून महाराष्ट्र पोलिसांकडून विशेष सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

जंतर-मंतर आंदोलनामुळे वाढली कुटुंबीयांची चिंता :

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ जंतर-मंतर येथे CJP कडून आंदोलन सुरू असून सरकारसोबत पक्षाच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली आहे. या चर्चेत संघटनेच्या तीन प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या मान्य झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी अद्याप मान्य झालेली नसल्याने आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार CJP ने व्यक्त केला आहे. सरकारने या विषयावर आज दुपारपर्यंत वेळ मागितला असून पुन्हा एकदा दोन्ही बाजूंमध्ये बैठक होणार आहे.

संघटनेने स्पष्ट भूमिका घेतली आहे की, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. त्यामुळे जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटू लागले असून अनेक ठिकाणी विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Abhijeet Dipke | राष्ट्रपतींकडे निवेदन, महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षेची मागणी :

अभिजीत दिपके यांनी सरकारसमोर विविध मागण्या मांडलेल्या असतानाच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अभिजीत यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी दिल्ली पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, दिल्ली पोलिसांवर विश्वास नसल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी अभिजीत दिपके यांना विशेष सुरक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अभिजीत दिपके यांच्या बहिणी स्नेहा जितिन वंजारे यांनी राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या निवेदनात, बीड (Beed) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही मागणी नोंदवली आहे. दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचा उल्लेख करत अभिजीत यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच अभिजीत यांचा अद्याप कुटुंबीयांशी संपर्क झालेला नसल्याने चिंता अधिक वाढली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, अभिजीत दिपके यांची प्रकृतीही खालावल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे कुटुंबीयांची काळजी आणखी वाढली आहे.

News Title: Abhijeet Dipke Security Demand

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now