अभिजीत दिपके राजकारणात येणार का? CJP ने स्पष्ट केली भूमिका

On: August 5, 2026 12:30 PM
Abhijeet Dipke
---Advertisement---

Abhijeet Dipke | कॉकरोच जनता पार्टीची दोन दिवसीय महत्त्वाची बैठक आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे सुरू झाली आहे. या बैठकीपूर्वी पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी आगामी वाटचाल, संघटन विस्तार आणि राजकारणातील भूमिकेबाबत महत्त्वाचे संकेत दिले. देशभरातील आंदोलनांपासून ते विविध राष्ट्रीय प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संघटन विस्तारावर बैठकीचा भर :

कॉकरोच जनता पार्टीच्या दोन दिवसांच्या बैठकीसाठी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले असून, ही बैठक अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. पक्षाच्या भविष्यातील धोरणांची आखणी, संघटन अधिक मजबूत करण्याची दिशा आणि आगामी कार्यक्रम यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी सौरभ रांका (Saurabh Ranka) यांच्यासह इतर नेतेही बैठकीसाठी उपस्थित झाले आहेत.

जंतर मंतर (Jantar Mantar) येथे झालेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राजीनामा दिला, हा पक्षासाठी मोठा विजय असल्याचा दावा करण्यात आला. गेल्या 12 वर्षांत भाजप (BJP) मधील आंदोलनानंतर झालेला हा पहिला राजीनामा असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. तसेच नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पुढील रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Abhijeet Dipke | राजकारणाबाबत भूमिका, पण मोठ्या घोषणेचे संकेत :

बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके यांनी पक्षाच्या आगामी रोडमॅपबाबत माहिती दिली. देशभरात संघटन कशा पद्धतीने विस्तारायचे, यावर बैठकीत सखोल चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. झारखंड मधील आंदोलनाला पक्षाने संपूर्ण पाठिंबा जाहीर केला असून, त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पक्षाचे प्रतिनिधी जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकारणात प्रवेश करण्याबाबत विचारले असता, “आमची राजकारणात जाण्याची इच्छा नाही, मात्र त्याबाबत माध्यमांमध्ये मोठी उत्सुकता आहे,” असे अभिजीत दिपके म्हणाले. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करत त्यांनी सकाळी एका पक्षात असलेले आमदार-खासदार संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जात असल्याचे उदाहरण दिले.

याशिवाय मीडिया, न्यायपालिका, बेरोजगारी आणि E20 यांसारख्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोनम वागचूक (Sonam Wangchuk) यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. उद्या दुपारी दोन वाजता माध्यमांशी संवाद साधला जाणार असून, त्यावेळी महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता असल्याने कॉकरोच जनता पार्टीच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: Abhijeet Dipke Hints CJP Roadmap

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now