आमिर खान तिसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; गौरी स्प्रॅटसोबत ‘या’ तारखेला अडकणार लग्नबंधनात?

On: June 3, 2026 6:04 PM
Aamir Khan Third Marriage
---Advertisement---

Aamir Khan Third Marriage | बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान (Aamir Khan) लवकरच तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही काळापासून आमिर गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. तो तिसरं लग्न करणार अशा अनेक चर्चाही रंगल्या मात्र त्या आमिरने फेटाळून लावल्या. अखेर आता आमिर तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. आमिर आणि गौरीच्या लग्नाची तारिखही समोर आली आहे.

एनडीटीव्ही (NDTV) ने दिलेल्या एका विशेष वृत्तानुसार, ५ जुलै रोजी आमिर त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. अभिनेता लवकरच या नात्याला अधिकृत स्वरूप देणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

साध्या पद्धतीने घरगुती विवाहसोहळा

आमिर आणि गौरी यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा अत्यंत साध्या पद्धतीने आणि खाजगीरीत्या पार पडेल. यासाठी कोणत्याही प्रकारचा मोठा इव्हेंट किंवा भव्य समारंभ आयोजित केला जाणार नाही. केवळ काही कायदेशीर कागदपत्रांवर सह्या करून, अगदी मोजके कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा घरगुती विवाहसोहळा संपन्न होईल. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरापासून हे दोघेही एकाच छताखाली एकत्र राहत असून, त्यांनी एक आनंदी कौटुंबिक वातावरण तयार केले आहे. अलीकडेच आमिरने एका निवेदनात ‘मनाने गौरी माझी पत्नीच आहे,’ अशी जाहीर कबुली दिली होती.

कोण आहे गौरी स्प्रॅट?

मूळची बंगळूरु (Bengaluru) येथील रहिवासी असलेल्या गौरीने तिचे शालेय शिक्षण ‘ब्लू माउंटन स्कूल’मधून पूर्ण केले आहे. तिच्या लिंक्डइन (LinkedIn) प्रोफाईलनुसार, तिने फॅशन क्षेत्रात आपले करिअर घडवले असून, लंडन (London) येथील ‘युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स’मधून फोटोग्राफी आणि स्टायलिंगचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. २०२५ मधील एका मुलाखतीत, तिने आमिरच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये (Aamir Khan Productions) काम करत असल्याचे स्पष्ट केले होते. गौरी आणि आमिरची ओळख गेल्या २५ वर्षांपासूनची असून, गेल्या दोन वर्षांपासून ते अधिकृतपणे एकमेकांना डेट करत आहेत. गौरीला तिच्या पहिल्या लग्नापासून एक सहा वर्षांचा मुलगा आहे.

आमिर खानचा मागील वैवाहिक प्रवास

आमिर खानने १९८६ मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण रीना दत्तासोबत (Reena Dutta) पहिले लग्न केले होते. हे एक गुप्त कोर्ट मॅरेज होते, ज्यासाठी त्याने कोणताही खर्च केला नव्हता. सुमारे १६ वर्षांच्या संसारानंतर २००२ मध्ये ते कायदेशीररीत्या वेगळे झाले. या दोघांना जुनैद आणि आयरा (Junaid and Ira Khan) ही दोन मुले आहेत. त्यानंतर २००५ मध्ये आमिरने दिग्दर्शिका किरण रावसोबत (Kiran Rao) दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यांना आझाद राव खान (Azad Rao Khan) हा मुलगा आहे. १५ वर्षे एकत्र राहिल्यानंतर, २०२१ मध्ये आमिर आणि किरण यांनी अचानक घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना मोठा धक्का दिला होता.

News Title: Aamir Khan Third Marriage Gauri Spratt 5 July

Join WhatsApp Group

Join Now