8th Pay Commission | देशभरातील सुमारे 44 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली होती. यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.
किती होणार पगारवाढ? फिटमेंट फॅक्टर किती असेल? :
सध्या आठव्या वेतन आयोगाची शिफारस प्रक्रिया सुरू असून, 2025 च्या अखेरीस सरकारकडे अंतिम अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार याला 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याचा विचार करत आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी थोडा वेळ लागू शकतो, आणि त्यामुळे एप्रिल 2026 नंतर ही वाढ लागू होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवतात.
आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये 30 ते 34 टक्क्यांची वाढ होऊ शकते, असा अंदाज अँबिट इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने व्यक्त केला आहे. सरकारवर यामुळे 1.80 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
8th Pay Commission | वेतनवाढीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारा Fitment Factor सध्या चर्चेत :
तज्ञांच्या मते, तो 1.83 ते 2.46 दरम्यान असू शकतो. याच फॅक्टरच्या आधारे मूळ वेतनाच्या किती पट वाढ होणार हे ठरवले जाते. Fitment Factor जास्त असल्यास, पगारवाढ अधिक असेल.
वेतन आयोगाची पुढील प्रक्रिया काय?
– आयोग आपला अहवाल 2025 च्या अखेरीस सादर करणार
– त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक
– महागाई दर, देशाची आर्थिक परिस्थिती यावर अंतिम निर्णय अवलंबून
– फक्त वेतनच नव्हे, तर भत्ते, बोनस, सेवा सुविधा याचाही समावेश आयोगाच्या शिफारशींमध्ये होतो






