सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, आठवा वेतन आयोग लांबणीवर?

On: February 4, 2025 12:03 PM
8th Pay Commission
---Advertisement---

8th Pay Commission | आठवा वेतन आयोग लागू होण्याची वाट पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. आगामी वर्षात अर्थात 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण प्रत्यक्षात मात्र 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता कमी दिसत आहे. यामागे काही तांत्रिक कारणे असल्याचे समोर आले आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ कधीपासून मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (8th Pay Commission)

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग देण्याची घोषणा सरकारने केली होती. तसेच, सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती आणि यासाठी दोन सदस्यीय समिती आणि अध्यक्षांची लवकरच नियुक्ती केली जाईल असे सांगितले होते. परंतु, 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?

लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये वेतन आणि पेन्शन सुधारणेसाठी एक आराखडा आणि अर्थसंकल्पीय तरतूद जाहीर करावी अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही.

सध्या सुरू असलेल्या सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होईल असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, सरकारने या अर्थसंकल्पात त्यासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. यामुळेच 2026-27 च्या अर्थसंकल्पातच त्यासाठी तरतूद केली जाईल असे संकेत मिळत आहेत.

आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तयार करून अंतिम करण्यासाठी किमान एक वर्ष लागू शकते. 2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाशी संबंधित कोणत्याही खर्चाचा समावेश नाही, कारण वेतन आयोगाचा अहवाल अंतिम होऊन मंजूर होण्यासाठी किमान एक वर्ष लागू शकते. अर्थ मंत्रालयाने यासाठी संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून सूचना मागवल्या आहेत. या विभागांकडून सूचना मिळाल्यानंतरच आयोगाचे काम औपचारिकपणे सुरू होईल. (8th Pay Commission)

Title : 8th pay commission likely to be delayed for- government employees

 

Join WhatsApp Group

Join Now