देशभरात पुढील 72 तास अत्यंत धोक्याचे! ‘या’ राज्यात हाय अलर्ट जारी

On: December 3, 2025 9:18 AM
Weather Update
---Advertisement---

Weather Update | गेल्या काही दिवसांपासून देशभरात वातावरणात मोठे बदल दिसत आहेत. काही ठिकाणी अचानक पावसाचे आगमन तर काही भागात गारठ्याची तीव्रता वाढलेली आहे. महाराष्ट्रातही हवामानाचा अनियमितपणा प्रकर्षाने जाणवत असून, भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा महत्वाचा इशारा जारी केला आहे. राज्यात पावसाबरोबरच थंडी वाढत (Cold Wave) असून, हवा प्रदूषणाचा तडाखा सर्वाधिक जाणवत आहे. (Maharashtra Weather Update)

मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांतील हवेची गुणवत्ता मागील काही दिवसांत खराब ते अत्यंत खराब श्रेणीत नोंदवली गेली आहे. चक्रीवादळाच्या परिणामामुळे मुंबईत सुरुवातीला पावसाचे प्रमाण वाढले आणि त्यानंतर हवा प्रदूषण एकदम उफाळून आले. आता पुण्यात शिवाजीनगर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ परिसरासह अनेक भागात हवा अत्यंत खराब बनली आहे.

72 तास मुसळधार पावसाचा इशारा :

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 72 तासांसाठी देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः केरळमध्ये सतत पावसाने कहर माजवला असून, येत्या तीन दिवसांत ‘अतिमुसळधार पावसाची’ शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्वीच्या चक्रीवादळामुळे केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता, आणि आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

तामिळनाडूमध्येही हवामानाचा मोठा परिणाम जाणवू लागला आहे. येत्या काही दिवसांत तमिळनाडूमध्ये पावसाचा जोर (Heavy Rain) वाढेल, असे IMD ने म्हटले आहे. दक्षिण भारतातील पावसाच्या या लाटेचा थेट परिणाम उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहावर होत आहे.

Weather Update | राज्यात गारठा वाढला, पारा घसरला :

महाराष्ट्रात दुसरीकडे थंडीचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात तापमान झपाट्याने घसरताना दिसत आहे. मराठवाडा आणि विदर्भात गारठा अधिक जाणवत असून, आहिल्यानगर, जेऊर, भंडारा या भागांत पारा 10 अंशांच्या खाली नोंदवला गेला आहे. (Heavy Rain)

आज दिवसभर राज्यात ढगाळ वातावरण राहील, तर दरी-खोर्‍यांमध्ये दवबिंदू आणि थंडीची (Cold Wave) धुकटता वाढेल. रात्रीच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने संपूर्ण महिनाभर राज्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

News Title: 72-Hour Heavy Rain Alert: IMD Warns High Alert, Cold Wave Intensifies in Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now