Palash Muchhal Wedding | भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 23 नोव्हेंबर रोजी दोघांचे लग्न होणार होते; परंतु स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले. यानंतर पलाशचीही तब्येत बिघडली आणि लग्न अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता वाढली होती. (Palash Muchhal Wedding)
दरम्यान, एयरपोर्टवर पलाश शांततेने जाताना दिसला आणि कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे स्मृती आणि पलाश यांच्या नात्यात काही बिनसलं का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता या सगळ्यावर पडदा पडत, पलाश मुच्छलच्या आईनेच मोठी गुड न्यूज दिली आहे.
पलाशच्या आईकडून ‘गुड न्यूज’ :
मुलाखतीत अमिता मुच्छल यांनी सांगितले की, “स्मृती आणि पलाश दोघेही कठीण काळातून जात आहेत. पण लवकरच सगळं सुरळीत होईल.” त्यांनी स्पष्ट केले की पलाशने आपल्या पत्नीबरोबर घरी परतण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि त्यासाठी त्यांनी घरी स्वागताची तयारीसुद्धा केली होती. (Palash Muchhal Wedding)
पलाशच्या आईने सांगितलेल्या या शब्दांमुळे लग्नासंदर्भात सकारात्मकता निर्माण झाली असून स्मृतीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अमिता यांनी पुढे सांगितले की, “दोघांचं लग्न खूप लवकर होईल,” अशा शब्दांत त्यांनी चाहत्यांना आश्वस्त केले.
Palash Muchhal Wedding | लग्नाची नवी तारीख काय? :
स्मृती मानधनाने लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट केल्याने लग्न मोडलं की काय? अशी चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र, पलाशच्या आईकडून मिळालेल्या माहितीनुसार लग्न लवकरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी दोन्ही कुटुंबे सकारात्मक आहेत आणि तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.
स्मृती आणि पलाश या दोघांचाही व्यस्त आणि दडपणाचा काळ सध्या सुरू आहे, पण लग्नाबद्दल दोन्ही बाजूंनी आशावादी भूमिका असल्यामुळे चाहते आता अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. क्रिकेट आणि संगीत या दोन क्षेत्रांना जोडणाऱ्या या खास जोडप्याचे लग्न कधी पार पडणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे.






