युवकांसाठी मोठी संधी! ठाणे मनपाच्या ‘या’ विभागात 601 जागांची भरती

On: June 24, 2026 5:36 PM
Thane Municipal Corporation
---Advertisement---

Thane Municipal Corporation | नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ठाणे महानगरपालिका(Thane Municipal Corporation) प्रशासनाने अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अग्निशमन दलातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी तब्बल 601 पदांसाठी भरती करण्यात येणार असून यासंदर्भातील प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

गावदेवी मंडई(Gaodevi Market) येथे घडलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची कमतरता पुन्हा एकदा चर्चेत आली होती. या दुर्घटनेत काही जवानांचा मृत्यू झाल्यानंतर उपलब्ध मनुष्यबळ आणि आपत्कालीन सेवांच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या महासभेत आयुक्त सौरभ राव(Saurabh Rao) यांनी तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली. सध्या अग्निशमन विभागात मंजूर 835 पदे असताना केवळ 325 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे उर्वरित रिक्त जागा भरणे आवश्यक बनले आहे.

लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार :

महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन विभागासह अभियांत्रिकी विभागातील भरतीसाठी येत्या दोन दिवसांत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना लवकरच अर्ज करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

राज्य शासनाच्या मान्यतेनुसार, या भरती प्रक्रियेत टीसीएस(TCS) कंपनी प्रशासनाला तांत्रिक सहाय्य करणार आहे. काही प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे ही भरती प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित होती. मात्र आता जुन्या जाहिरातीच्या निकषांनुसारच भरती पूर्ण करण्यासाठी टीसीएसच्या पथकाशी चर्चा झाल्याची माहितीही देण्यात आली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता आहे.

Thane Municipal Corporation | फायर सेफ्टी ऑडिट आणि अन्य उपाययोजना :

महानगरपालिकेच्या विविध शाळा, रुग्णालये, मंडई आणि इतर सार्वजनिक इमारतींमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांबाबत महासभेत चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व प्रमुख इमारतींचे फायर सेफ्टी ऑडिट(Fire Safety Audit) नियमितपणे होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यानुसार पुढील महिनाभरात महापालिकेच्या सर्व महत्त्वाच्या वास्तूंची तपासणी केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

याशिवाय आग प्रतिबंधक उपाय अधिक प्रभावी करण्यासाठी अद्ययावत मॉक ड्रिल(Mock Drill) कार्यक्रमही राबवला जाणार आहे. गावदेवी मंडई दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दोन जवानांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले. तसेच शहरात नवीन अग्निशमन केंद्रे उभारणे, अग्निशमन वाहनांची संख्या वाढवणे आणि संपूर्ण दल अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

News title : 601 Fire Department Jobs In Thane

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now