साफसफाई करताना घरात 36 वर्षांपूर्वीचे रिलायन्स शेअर्स सापडले, किंमत ऐकून व्हाल थक्क!

On: March 13, 2025 10:03 AM
36-Year-Old Reliance Shares Found in Chandigarh
---Advertisement---

Reliance Shares | शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची असली तरी, कधीकधी अनपेक्षितपणे मोठा फायदा देऊ शकते. चंदीगडमधील (Chandigarh) रतन ढिल्लों यांच्यासोबत असाच काहीसा प्रकार घडला, ज्यामुळे त्यांना शेअर बाजाराने (Share Market) लॉटरीच लावली.  (Reliance Shares)

घरात साफसफाई करत असताना, ढिल्लों यांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited – RIL) शेअर्स आणि त्याची काही कागदपत्रे सापडली. 1988 मध्ये, त्यांच्या कुटुंबीयांनी 10 रुपये प्रति शेअर या दराने 30 इक्विटी शेअर्स (Equity Shares) खरेदी केले होते. मात्र, ज्या व्यक्तीने हे शेअर्स खरेदी केले होते, ती व्यक्ती आज हयात नाही.

सोशल मीडियावर (Social Media) मागितला सल्ला

शेअर मार्केटसंदर्भातील फारशी माहिती नसल्यामुळे, ढिल्लों यांनी या शेअर प्रमाणपत्राचा फोटो X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला आणि ‘याचे पुढे काय करावे?’ असा प्रश्न विचारून लोकांकडून मार्गदर्शन मागितले.

ढिल्लों यांची पोस्ट व्हायरल (Viral) झाली आणि शेअर बाजाराची माहिती असणाऱ्या अनेकांनी ती खरी असल्याचे सांगितले. काही नेटकऱ्यांनी सध्याची शेअर बाजारातील स्थिती पाहता, तीन स्टॉक स्प्लिट (Stock Split) आणि दोन बोनस (Bonus) नंतर शेअरची किंमत 960 रुपयांवर पोहोचल्याचे सांगितले. म्हणजेच, हे 30 शेअर्स ढिल्लों यांना 11 ते 12 लाख रुपये मिळवून देऊ शकतात.

पुढे काय करावे?

काहींनी ढिल्लों यांना हे शेअर्स डिमॅट खात्यात (Demat Account) ट्रान्सफर करण्याचा सल्ला दिला, तर काहींनी कागदपत्रांची पडताळणी करण्याचा सल्ला दिला. आता ढिल्लों यांना यातून कसा आणि किती फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Title : 36-Year-Old Reliance Shares Found in Chandigarh

 

Join WhatsApp Group

Join Now