Watermelon | उन्हाळा सुरू झाला की बाजारात कलिंगडाची रेलचेल सुरू होते, पण आतून गोड, रसाळ आणि लालसर कलिंगड मिळेलच याची खात्री असते का? अनेकदा विक्रेत्यांच्या भूलथापांना बळी पडून फसवणूक होते. त्यामुळे खाली दिलेले तीन सोपे उपाय फॉलो केल्यास तुम्ही चांगलं कलिंगड (Watermelon) निवडू शकता.
वजनावरून कलिंगड रसाळ की पोकळ, हे कसं ओळखाल?
चांगलं कलिंगड हे दिसायला जरा मोठं वाटतं पण तेच जर हलकं असेल, तर सावधान! वजन कमी म्हणजे आतून पोकळ किंवा पांढरसर असण्याची शक्यता अधिक. त्यामुळे बाजारात कलिंगड घेताना त्याचे वजन हातात घेऊन तपासा.
आकाराच्या मानाने जर ते जास्त वजनदार वाटलं, तर ते रसाने भरलेलं आणि गोड असल्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पुढच्या वेळी कलिंगड उचलताना ‘हलकं वाटतंय का?’ याकडे नक्की लक्ष द्या.
रंग आणि पोत तपासूनच घ्या योग्य कलिंगड
कलिंगड निवडताना त्याच्या बाह्यरंगाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एकसंध आणि थोडं चमकदार हिरवट काळसर रंग असलेलं कलिंगडच सर्वोत्तम असतं. जर त्यावर वेगवेगळे डाग, ओरखडे, किंवा पोत असमान असेल, तर ते आतून खराब निघण्याची शक्यता असते. शिवाय विक्रेत्यांनी कलिंगडवर टपकवून आवाज कसा येतो ते दाखवणं नवीन नाही—हे खरंच काम करतं! एकसंध, खोखो आवाज येणारा टरबूज आतून पिकलेला आणि गोड असतो.
कलिंगडवर पिवळा डाग म्हणजे पिकलेलं आणि लालसर गोडसर फळ
कलिंगड घेताना त्यावर पिवळसर डाग आहे का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या डागाला ‘फील्ड स्पॉट’ म्हटलं जातं, जो शेतात कलिंगड जमिनीवर पडलेलं असताना सूर्यप्रकाशामुळे तयार होतो.
जर हा डाग पिवळसर असेल, तर तो टरबूज झकास पिकलेलं आणि आतून गडद लालसर असण्याची शक्यता अधिक. मात्र हा डाग जर पांढरसर किंवा फारसा स्पष्ट नसेल, तर ते अर्धवट पिकलेलं असू शकतं.
Title : 3 Smart Tricks to Pick Sweet Red Watermelon






