महाराष्ट्रात नवीन पर्यटनस्थळ; नवीन महाबळेश्वरमध्ये ‘या’ गावांचा समावेश होणार

On: February 3, 2025 10:31 AM
294 More Villages to be Included in New Mahabaleshwar Hill Station Project
---Advertisement---

New Mahabaleshwar | नवीन महाबळेश्वर (New Mahabaleshwar) गिरिस्थान प्रकल्पात (Hill Station Project) आणखी २९४ गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या मंजुरीनंतर सातारा (Satara) जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar), पाटण (Patan), सातारा (Satara), जावळी (Jawali) या तालुक्यांतील एकूण ५२९ गावांसाठी एमएसआरडीसी (MSRDC) नियोजन प्राधिकरण (Planning Authority) म्हणून काम करेल.

प्रकल्पाचा विस्तार आणि उद्देश

यापूर्वी नवीन महाबळेश्वर गिरिस्थानात समाविष्ट केलेल्या २३५ गावांच्या अधिसूचित क्षेत्रानजीक असलेल्या २९४ गावांचाही या प्रकल्पात नव्याने समावेश करण्यात येणार आहे. या २९४ गावांचे एकूण क्षेत्रफळ ९४४ चौ. किमी आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून, त्यातून या भागाचा नियोजनबद्धरितीने विकास होण्यास मदत मिळेल, असे एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या २३५ गावांचे एकूण क्षेत्र १,१५,३०० हेक्टर आहे. आता नव्याने समाविष्ट केल्या जाणाऱ्या २९४ गावांचे क्षेत्रफळ ९४,४०४ हेक्टर एवढे आहे. या नव्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास साताऱ्यातील ५२९ गावांतील २,०९,७०० हेक्टर क्षेत्रासाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागातील पर्यटन, आणि निसर्गसंपदा विकास केंद्र प्रस्तावित केले आहे. त्यातून तेथे पर्यटनाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

समाविष्ट होणारी गावे

या प्रस्तावात सातारा तालुक्यातील १०१ गावांचा समावेश असून, त्यामध्ये यवतेश्वर, पाटेघर, रेवळी, परळी, नुणे, रोहोत, सरखाल, भांबावळी, चिंचणी, दरे बुद्रुक, धावडशी, कळंबे, कामठी तर्फे सातारा, कान्हेर, करंजे तर्फे परळी, आंबावडे बु., आगुडेवाडी या गावांचा समावेश आहे. पाटण तालुक्यातील १९३ गावांमध्ये झाकडे, विहे, करंजवडे, येरफळे, तोरणे, साळवे, सांबूर, शिंदेवाडी, शिरशिंगे, तळीये, तेलेवाडी, नवजा, नाटोशी, निवडे, रोहिने, मारूळ हवेली, मुरूड, म्हावशी, मणेरी, गोकुळ तर्फे हेळवाक, जरेवाडी, काळगाव, डिचोळी, दिवाशी खुर्द, बाणपुरी, चाळकेवाडी या गावांचा समावेश आहे. जावळी तालुक्यातील ४९ गावांमध्ये मालदेव, मेट इंदवली, मोहाट, पाली तर्फे तांब, ताकवली, तांबी, वासोटा, आडोशी, अंबेघर तर्फे मेढा, भणंग, गवडी, जुंगटी, खिरखंडी, कुसापुर, कुसवडे, माडोशी या गावांचा समावेश आहे. (New Mahabaleshwar)

प्रकल्पातील सुविधा

या २३५ गावांमध्ये रोपवे, घाटमाथा रेल्वे, सायकल ट्रॅक, फ्युनिक्युलर रेल्वे यांच्या विकासासह टुरिस्ट पॅराडाइज, पर्यटन आणि निसर्गसंपदा विकास केंद्र प्रस्तावित केले आहे.

नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पाचा विस्तार होऊन त्यात आणखी २९४ गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे या भागाचा नियोजनबद्ध विकास होऊन पर्यटनाला चालना मिळेल. (New Mahabaleshwar)

Title: 294 More Villages to be Included in New Mahabaleshwar Hill Station Project

 

Join WhatsApp Group

Join Now