नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वेमध्ये 1007 पदांची भरती, तरुणांनो अर्ज करण्यासाठी उरले फक्त 3 दिवस

On: May 2, 2025 7:44 AM
Railway Recruitment 2025
---Advertisement---

Railway Recruitment 2025 | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR), RRC नागपूर विभागात अप्रेंटिसच्या 1007 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, मात्र अर्ज करण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा अवधी उरलेला आहे.

SECR नागपूर विभागात 1007 पदांची भरती 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या नागपूर विभागात 1007 अप्रेंटिस पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीत 919 पदे नागपूर विभागासाठी तर उर्वरित 88 पदे मोतीबाग वर्कशॉपसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. इच्छुक उमेदवारांनी http://apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 4 मे 2025 ठेवण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असावी (किमान 50% गुणांसह), तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे. उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे तर कमाल वय 24 वर्षे (5 एप्रिल 2025 रोजी) असणे आवश्यक आहे.  राखीव प्रवर्गासाठी वयमर्यादेत सवलत देणात आली आहे. SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, दिव्यांग – 10 वर्षे सवलत आहे.

या भरतीसाठी सामान्य / OBC / EWS यांना ₹100 रुपये शुल्क असून SC / ST / PwD साठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. उमेदवारांना  स्टायपेंड देखील आकर्षक दिला जाईल.  2 वर्षांचा आयटीआय कोर्स असलेल्या उमेदवारांना दरमहा 8050 रुपये तर 1वर्षाचा आयटीआय कोर्स असलेल्यांना दरमहा 7700 रुपये देण्यात यतील.

अर्ज करण्याची प्रक्रिया 

  1. http://secr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. नवीन नोंदणी करा आणि लॉगिन करा
  3. अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. अर्ज फी भरा (जर लागू असेल)
  6. अर्ज सबमिट करा आणि त्याचा प्रिंटआउट घेऊन ठेवा

 Title: 1007 Apprentice Posts Railway Recruitment 2025 

 

Join WhatsApp Group

Join Now