Raigad | रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीमध्ये (Mahad MIDC) पोलिसांनी अमली पदार्थ बनवणाऱ्या एका कारखान्यावर मोठी कारवाई केली आहे. या संयुक्त कारवाईत, सुमारे ८८ कोटी ९२ लाख रुपये किमतीचा ‘किटामाईन’ (Ketamine) नावाचा प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
महाड एमआयडीसी पोलीस, रायगड (Raigad) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने ही संयुक्त कारवाई केली. महाड औद्योगिक वसाहतीमधील ‘रोहन केमिकल्स’ (Rohan Chemicals) नावाच्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ बनवले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी कंपनीवर छापा टाकला असता, तिथे विनापरवाना तयार केलेला किटामाईनचा मोठा साठा आढळून आला.
चार आरोपींना अटक-
या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये महाडमधील मच्छिंद्र भोसले आणि सुशांत संतोष पाटील, कोल्हापूरचा (Kolhapur) शुभम सुतार आणि मुंबईतील (Mumbai) मालाडचा (Malad) रोहन गवस यांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) १९८५ च्या विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या अमली पदार्थांची विक्री कोणत्या मार्गाने केली जात होती, याचा शोध पोलीस घेत आहेत. जिल्ह्यातील अवैध अमली पदार्थांविरोधातील मोहिमेतील ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे (Sanjay Darade) यांनी कारवाई करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे.
News Title – ₹89 Crore Ketamine Seized in raigad Drug Bust






