जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचं बिगूल वाजलं! जाणून घ्या सर्व माहिती

On: January 13, 2026 4:40 PM
ZP Election 2026
---Advertisement---

ZP Election 2026 | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.

निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू होणार असून २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या निवडणुकांसाठी मतदान ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून मतमोजणी ७ फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत. (Panchayat Samiti Election)

निवडणूक कार्यक्रम जाहीर :

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २२ जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजल्यानंतर अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हे जाहीर केली जाणार आहेत.

५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल जाहीर केले जातील.

ZP Election 2026 | १२ जिल्हा परिषदांसाठी मतदान, मतदारांना दोन मते :

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षणाच्या चौकटीत या निवडणुका घेतल्या जात आहेत. या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. (ZP Election 2026)

या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागणार आहेत. एक मत जिल्हा परिषदेसाठी तर दुसरे मत पंचायत समितीसाठी असणार आहे. उमेदवारी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने होणार असून राखीव जागांसाठी जातवैधता प्रमाणपत्राची पडताळणी आवश्यक असणार आहे. निवडणूक जाहीर होताच कोकण, पुणे आणि संभाजीनगर विभागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

News Title: Zilla Parishad and Panchayat Samiti Election Dates Announced, Voting on February 5

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now