आरोपींना पोलीसच वाचवताय?, ‘त्या’ हत्याप्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप

On: January 10, 2025 12:38 PM
Crime News
---Advertisement---

Crime News l राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला मुंबईतील वांद्रे येथील मुलाच्या कार्यालयासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मात्र त्यानंतर राज्यात सर्वत्र खळबळ उडाली होती. मात्र त्या हत्येनंतर अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही मिळालेली नाहीत. मात्र आता बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकीने पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली आहे.

संशयिताची अद्यापही चौकशी नाही :

बाबा सिद्दीकी यांची हत्या बिश्नोई गँगने केली की अजून कोणी केली? यासंदर्भात अद्यापही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. त्यामुळे झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली. कारण या प्रकरणातील पोलीसच काही आरोपींना वाचवत असल्याचा धक्कादायक आरोप झिशान सिद्दीकीने केला आहे. यासंदर्भात झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली आणि तपासातील काही त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

या हत्या प्रकरणी अद्यापही संशयिताची साधी चौकशी सुद्धा केली नाही, त्यामुळे झिशान सिद्दीकी यांनी पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच या हत्येप्रकरणी ज्यांच्यावर यापूर्वी संशय व्यक्त केला होता, त्यांची देखील अद्याप चौकशी केली नाही.

Crime News l हत्या प्रकरणात बिल्डर लॉबीचा सहभाग? :

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात बिल्डर लॉबीचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. यामुळे पोलिसांनी तपासादरम्यान ज्या बिल्डरवर, बांधकाम व्यावसायिकांवर संशय व्यक्त केला, त्यांची देखील अद्याप चौकशी का केली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

याशिवाय या खूनप्रकरणाशी बिल्डर लॉबीचा संबंध असू शकतो, त्यामुळेच पोलिसांनी अद्यापही त्यांची चौकशी केली नाही असा ठपका झिशान सिद्दीकी यांनी ठेवला आहे. त्यामुळे आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये नेमका कोणाचा हात आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे.

News Title : Zeeshan Siddiqui serious accusation to baba Siddiqui murder

महत्वाच्या बातम्या –

बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार हॉलतिकीट, अशाप्रकारे करा डाऊनलोड

नवीन कार खरेदी करायचा विचार करताय? तर ही बातमी वाचाच

‘…तर कायमची वाट लावेन, हात-पाय तोडेन’; चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडची धमकी?

सरपंच हत्या प्रकरणात मोठा पुरावा हाती, वाल्मिक कराडचा पाय खोलात?

लग्नसराईत दागिने घ्यायचा विचार करताय?, पाहा लेटेस्ट 1 ते 10 ग्रॅम सोन्याचे दर

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now