‘गरोदरपणात नवरा दुसऱ्या बाईसोबत होता’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

On: May 6, 2025 12:26 PM
---Advertisement---

Bollywood l बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या झीनत अमान  (Zeenat Aman) यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक वेदना सोसल्या. आईच्या विरोधात जाऊन केलं लग्न अखेर त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. (Zeenat Aman Regrets Marriage)

आईच्या विरोधात केलं लग्न, पण झाला मोठा पश्चाताप :

झीनत अमान या 1980 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची कहाणी मात्र खूप वेगळी आणि वेदनादायी आहे. 1985 मध्ये त्यांनी अभिनेता मझर खानसोबत सिंगापूरमध्ये थाटामाटात लग्न केलं. हे लग्न आईच्या विरोधात केलं गेलं होतं. पण झीनत यांनी एका मुलाखतीत सांगितले की, लग्न ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. (Zeenat Aman Regrets Marriage)

एका मुलाखतीत झीनत यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे केले. “मी गरोदर असताना माझे पती माझ्यासोबत नव्हते, ते दुसऱ्या महिलेसोबत होते,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यांना पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल जेव्हा कळलं, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलाच्या जन्मानंतर त्या नातं तोडण्याचा विचार त्यांनी केला होता, मात्र परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य झालं नाही.

Bollywood l १२ वर्ष नको असलेल्या नात्यात जगावं लागलं :

झीनत यांचे पती मझर खान दीर्घकाळ आजारी होते. त्यांचं 16 सप्टेंबर 1998 रोजी निधन झालं. त्या काळात झीनत यांना तब्बल 12 वर्षं जबरदस्तीने, नको असलेल्या नात्यात राहावं लागलं. त्यांनी आपल्या मुलांसाठी आणि आजारी पतीसाठी ही वेदना सहन केली, असं त्या सांगतात.

सध्या झीनत अमान चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी सोशल मीडियावर त्या कायम सक्रिय आहेत. आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी त्या नेहमी फोटो आणि विचार शेअर करत असतात. त्यांच्या पोस्ट्स नेहमी चर्चेचा विषय ठरतात.

News Title: Zeenat Aman Regrets Marriage Done Against Mother’s Wish

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now