पुणे, नाशिक, अहिल्यानगरमध्ये महापौरपदाची चावी कोणाच्या हाती? महत्वाची माहिती समोर

On: January 22, 2026 3:03 PM
Mayor Reservation
---Advertisement---

Mayor Reservation | राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आज महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीनंतर अनेक राजकीय समीकरणे बदलली असून, अनेक दिग्गज इच्छुकांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर महापालिकांमध्ये (Ahilyanagar Municipal Corporation Mayor) महिला महापौर निश्चित झाल्याने राज्यातील स्थानिक राजकारणात महिलांचा प्रभाव अधिक वाढताना दिसत आहे.

महापालिका निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून अनेक ठिकाणी त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, पुणे आणि पिंपरी चिंचवड यासारख्या मोठ्या महापालिकांमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही भाजपने मजबूत पकड निर्माण केली असून, सोलापूरमध्ये पक्षाने विशेष कामगिरी केली आहे. अशा पार्श्वभूमीवर महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

महिला महापौर कुठे निश्चित? :

आरक्षण सोडतीनुसार पुणे महापालिकेचे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. त्याचप्रमाणे नाशिक आणि अहिल्यानगर महापालिकांमध्येही महिला महापौर निश्चित आहेत. अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला महापौर होणार असून, नाशिकमध्येही महिला उमेदवारालाच संधी मिळणार आहे. यामुळे राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. (Ahilyanagar Municipal Corporation)

धुळे आणि मालेगाव महापालिकांमध्येही खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौर पद राखीव करण्यात आले आहे. जळगाव महापालिकेत ओबीसी महिला प्रवर्गासाठी महापौर पद निश्चित झाले आहे. या निर्णयांमुळे उत्तर महाराष्ट्रात महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व लक्षणीय वाढणार आहे, असे चित्र आहे.

Mayor Reservation | पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूरमध्ये कोणाला संधी? :

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि सोलापूर महापालिकांमध्ये (Solapur Mahapalika) महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे येथे महिला किंवा पुरुष उमेदवार कोण होणार, याचा निर्णय संबंधित पक्षांच्या संख्याबळावर अवलंबून असेल. दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता असल्यामुळे पक्षातील इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

कोल्हापूर महापालिकेत महापौर पद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्याचप्रमाणे इचलकरंजी महापालिकेतही ओबीसी महापौर होणार आहे. सांगली-मिरज-कुपवाड आणि सातारा महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले असून, तेथेही कोणाला संधी मिळणार याबाबत राजकीय हालचाली वेगाने सुरू आहेत.

News Title: Women Mayors in Pune, Nashik and Ahilyanagar; What About Pimpri Chinchwad, Solapur and Kolhapur?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now