Winter Care | ऑक्टोबर महिना आता संपत आला आहे. अनेक ठिकाणी सध्या थंडीची चाहूल लागली आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर देखील वाढला आहे. त्यामुळे कुठे ऊन तर कुठे पाऊस असं वातावरण सध्या दिसून येतंय. वातावरण बदलामुळे अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवतोय. यावर काही घरगुती उपाय, या लेखात सांगितले आहेत. हे उपाय वापरुन पाहिल्यास तुम्हाला सर्दी-खोकल्यापासून नक्कीच आराम मिळू शकतो. (Winter Care)
सर्दी-खोकल्यासाठी घरगुती उपाय
आल्याचा चहा : तुम्हाला सर्दी आणि खोकला या दोन्हींचा त्रास होत असेल तर चहामध्ये आले घालून प्यायला सुरुवात करा. यामुळे तुम्हाला नक्कीच काही अंशी आराम मिळेल.
आल्याचा काढा : हा काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम गरम पाणी करा. त्यात आल्याचे छोटे तुकडे टाका आणि उकळवा. तुम्ही ते जसे आहे तसे पिऊ शकता किंवा मध घालून देखील पिऊ शकता. यामुळे खोकल्याला खूप आराम पडेल.
कोमट पाण्याने गुळण्या करा : कफ आणि खोकल्यामुळे घसा कोरडा पडतो. किंवा घसा दुखत असेल तर कोमट पाण्यात काळे मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे ऊब मिळेल आणि घशातील जंतूही नष्ट होतील. (Winter Care)
हळदीचे दूध प्या : हळदीचे दूध घेतल्याने देखील बऱ्यापैकी आराम मिळतो. यासाठी तुम्हाला कच्ची हळद, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी पावडर दुधात मिसळून चांगले उकळावे लागेल. अशा प्रकारे तयार केलेल्या हळदीच्या दुधाचे सेवन करा.
तुळस आणि आल्याचा काढा : एका लहान पातेल्यात एक ग्लास पाणी गरम करा. त्यात मिरी, लवंग, दालचिनी, आले आणि तुळशीची पाने टाका आणि 5 ते 7 मिनिटे उकळवा. यानंतर मध घालून ते गरम गरम प्या. यामुळे तुम्हाला खोकल्याला आराम मिळेल.
आवळा ज्यूस : आवळा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यासोबतच बाहेर जाताना मास्क घाला. तसेच, बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या. या उपायांनी तुम्हाला नक्कीच फरक दिसून येईल. (Winter Care)
News Title : Winter Care Cough-Cold Remedy
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! पुण्यातील ‘या’ मेट्रो स्थानकाला भीषण आग, मोदींनी नुकतंच केलतं उद्घाटन
राज्यात पुन्हा मुसळधार, ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून हायअलर्ट
मोठी बातमी! कॉँग्रेसचे ‘इतके’ उमेदवार निश्चित?, समोर आली यादी
आज सोमवारी, भोलेनाथ कोणत्या राशीवर प्रसन्न होणार?, वाचा राशी भविष्य
कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा तर कुणाची लेक, भाजपच्या पहिल्या यादीत नवे चेहरे






