माधुरी दीक्षित ‘सडपातळ’ म्हणून तिच्यासोबत…? प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या वक्तव्याने उडाली खळबळ!

On: April 5, 2025 4:07 PM
madhuri dixit
---Advertisement---

Madhuri Dixit l बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही कायम चर्चेत राहिली आहे. आज ती वैवाहिक आयुष्यात आनंदी असूनही, तिच्या तरुणपणी काही गोष्टी अशा घडल्या ज्यामुळे तिचं खासगी आयुष्य प्रकाशझोतात आलं. त्यातील एक म्हणजे प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी तिला लग्नासाठी नकार देण्यामागचं कारण.

माधुरीसाठी सुरेश वाडकरांचा नकार, कारण ऐकून चाहत्यांना धक्का :

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांचं नाव लग्नाआधी अनेक सेलिब्रिटींसोबत जोडलं गेलं. सर्वात चर्चित नाव होतं अभिनेता संजय दत्तचं (Sanjay Dutt). मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. एक तर संजय तेव्हा विवाहित होता आणि दुसरं म्हणजे माधुरीच्या घरच्यांचा त्याच्या विरोधात असणं.

त्याच दरम्यान माधुरीचे आई-वडील तिचं लग्न लवकर करण्याच्या विचारात होते. त्या काळात त्यांनी गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांच्याशी लग्नाच्या विषयावर चर्चा केली. माधुरीपेक्षा ११ वर्षांनी मोठ्या असलेल्या वाडकर यांना हे स्थळ जमतं का, हे विचारण्यात आलं.

मात्र वाडकर यांनी थेट नकार दिला आणि कारण दिलं – “माधुरी खूप सडपातळ आहे, त्यामुळे मी तिच्यासोबत लग्न करू शकत नाही.” हे ऐकून माधुरीचे पालक खूप नाराज झाले होते. पुढे हा विषय तिथेच संपला.

Madhuri Dixit l डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबतचं सुखी वैवाहिक आयुष्य :

या सर्व घडामोडीनंतर अखेर माधुरी दीक्षितने अमेरिकास्थित हृदयतज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांच्याशी विवाह केला. ते तिच्यापेक्षा ८ वर्षांनी मोठे आहेत. दोघांना दोन मुले असून, सध्या ते एकत्र सुखी संसार करत आहेत. माधुरी बॉलिवूडमध्ये फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती कायम अपडेट राहते.

माधुरीच्या पोस्ट्सवर आजही चाहते भरभरून प्रेम करतात. तिचं सौंदर्य, अभिनय आणि साधेपणा पाहून ती आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते.

News Title: Why Suresh Wadkar Rejected Madhuri Dixit

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now